सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत सामुहिक शेततळे, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, कांदाचाळ, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ देण्यासाठी वेळोवेळी प्रसिद्धी करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार अर्ज केलेले व विहित कालावधीत अर्ज करू न शकलेल्या इच्छुक शेतकऱ्यांची सभा शनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.
शेडनेट हाऊस व पॉली हाऊससाठी २२८ अर्ज, सामुहिक शेततळेसाठी ३७ अर्ज, कांदाचाळसाठी ३६४, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणसाठी १५ अर्ज, फलोत्पादन यांत्रीकीकरणसाठी ३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अजर केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी दि. १८ रोजीच्या सभेस उपस्थित रहावे. या सभेमध्ये जे शेतकरी त्यांच्या अर्जांना मान्यता दिल्यास तात्काळ काम पूर्ण करून घेतील, अशा लाभधारकांना मंजुरी देण्याचे नियोजित आहे. शिवाय मुदतीत अर्ज न केलेल्या इच्छुक शेतकऱ्यांनाही अजून उपरोक्त बाबींचा लाभ घेऊन इच्छित असल्यास या सभेस उपस्थित रहावे, असे श्री. गावसाने यांनी कळविले आहे
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा