शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जातीवाचक वक्तव्याचा जाहीर निषेध


नाभिक समाजाचा दशक्रिया व मुंडन कार्यक्रम

सम्राट टाइम्स लाईव्ह 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने  एका कार्यक्रमात नाभिक समाजाबद्दल जाहीर जातीवाचक वक्तव्य करून नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल रिसोड येथे नाभिक समाजाच्या वतीने आज मुख्यमंत्र्याची दशक्रिया आणि मुंडन विधी करून निषेध नोंदविण्यात आला 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील भीमा साखर कारखान्यात जाहीर सभेत बोलताना नाभिक समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य केल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखाविल्या  महाराष्ट्राभर नाभिक समाजात मुख्यमंत्री विरोधी संतापाची लाट पसरली  रिसोड येथील नाभिक समाजाच्या वतीने आज  येथील गुजरी चौकात दशक्रिया व मुंडन करून मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला  तहसिलदार सुरडकर यांना यावेळी  निवेदनही देण्यात आले.उद्या दि 18 नोव्हेंबर शनिवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ वाशिम  जिल्ह्यातील सर्व नाभिक दुकाने  कडकडीत बंद ठेवणार असल्याची माहिती  नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली
  मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा  नाभिक समाजाच्या वतीने तीव्र  आंदोलन छेडण्याचा इशारा नाभिक  समाजाने दिला आहे 

सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा