शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

भुलोडा येथे लष्करी महाराज यात्रा महोत्सव २७ नोव्हेंबर ला


कारंजा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र  भुलोंडा येथील लष्करी महाराज यांची जन्माष्टमी म्हणून यात्रा हि २७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. हा यात्रा महोत्सव एकूण ३ दिवसाचा असणार आहे. त्यामध्ये  भुलोंडा ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये श्रीमद भागवत गीता व  हरिनाम सप्ताह चे आयोजन केले आहे . हे कार्यक्रम  भागवताचार्य ह. भ. प. एकनाथ महाराज शेळके , येडशीकर यांच्या मधुर वाणीतून होत आहे. व त्याचा वेळ दु. ३ ते ५ असा असणार आहे. तरी २७/११/२०१७ रोजी सकाळी १० वाजता श्री. संत परमहंस लष्करी महाराज व श्री. संत नर्मदा माताजी यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा नंतर दहीहंडी काला , कीर्तन संजय महाराज आळंदी व दहीहंडी श्री. कुंजबिहारी महाराज धनजकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. तरी भविभक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेचा आस्वाद घ्यावा. 
टीप. : भुलोंडा हे गाव कामरगाव वरून ३ कि.मी. आहे. रिक्षा व बस सुरु आहेत. 
विनोद नंदागवळी ( कामरगाव  रिपोर्टर ) मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा