शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

कोलदरा येथे वृद्धाची आत्महत्त्या



सम्राट टाइम्स लाईव्ह
मेडशी येथून जवळच असलेल्या कोलदरा येथील 60 वर्षीय कुंडलिक गणपत इंगळे वृद्धाने भावाच्या शेतात गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना आज दुपारी 1  वाजता उघडकीस आली 
कोलदरा येथील कुंडलिक गणपत इंगळे या वृद्धाने मेडशी शिवारातील गट क्रमांक 98 मेडशी भाग 2 मध्ये असलेल्या  सख्या भाऊ तुकाराम गणपत इंगळे यांच्या शेतात दुपारी 1 वाजता गळफास लावून आत्महत्त्या केल्याची माहिती पोलीस पाटील सखाराम करवते यांनी मेडशी पोलीस चौकीला दिली घटनेची माहिती मिळताच तलाठी कोल्हे व बानाईत आणि पोलीस उपनिरीक्षक सुकेशनी जमधड़े पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही 
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा