उकळी पेन : उकळी पेन परिसरात सध्या राजगाव विद्युत फिडर मधून...राजगाव , उकळी ,क्रुश्णा , धूमका , शिवार अश्या परिसरात विद्युत पुरवठा करण्यात येतो.परंतु हे फिडर कमी दाबाचे असल्याने वारंवार लोड येऊन आपोआपच बंद पडत आहे , त्यामुळे या विद्युत फिडर वरील अतिभार कमी करण्यासाठी धूमका हे गाव वाशिम फिडर ला जोडण्यात येत असून सध्या 8 ते 10 सीमेंट पोल उभे करण्यात आले आहेत......!
ही लाइन 33 के.व्ही. मधून आणण्यात येत असून यासाठी उभे केलेले पोल राजगुरु विद्यालय ते समोर असे आहे.परंतु सदर काम करतांना 33 के.व्ही.साठी वापरण्यात येणारे हे उंच व जड़ असे सीमेंट पोल जमिनीत गाडताना पोलच्या खड्ड्यांमध्ये कुठलेही सीमेंट बेड न टाकता कच्या जमिनीवर पोल उभे करण्यात आले असून त्यामध्ये टोळ गोटे व कचा मुरूम भरून त्यावर जमीन लेव्हल ला दोन टोपली गिट्टि आणि अतिशय कमी प्रमाणात सीमेंट वापरून थातूरमातुर काम करण्यात आले आहे.त्यामुळे त्यांच्याच बाजूला उभे असलेले परंतु लवन्डलेल्या अवस्थेत असलेले पोल जे विद्युत ताराच्या आधारे उभे आहेत तशीच अवस्था याही पोल ची होऊन एखादी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही....!
त्यामुळे सदर बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारावर सम्बन्धीत विद्युत महावितरण विभागाने लक्ष देऊन व्यवस्थित काम का करुन घेऊ नये अशी मागणी कास्तकार वर्गातुन केली जात आहे.कारण अश्या बोगस कामांमुळे पुढे विद्युत प्रॉब्लेम येऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे विद्युत महावितरण विभागाने अशा कामाकडे त्वरित लक्ष देऊन सदर काम मजबूत करून घ्यावे अशी मागणी होत आहे.
सम्राट टाईम्स प्रतिनिधि
सुरेश इंगोले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा