शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

भुलोडा येथील नळयोजना ५ वर्षांपासून बंद


कारंजा तालुक्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून असलेले ग्राम भुलोडा येथील नळ योजना बंद पडलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी पंचाईत झालेली आहे. सदर नळ योजना हि बिल न भरल्यामुळे बंद पडलेली आहे असे दिसून आले. हि समस्या पिण्याच्या  पाण्याची असून  त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. भुलोंडा हे गाव तीर्थक्षेत्र असल्यामुळे येत्या २७ तारखेला येथे मोठी यात्रा भरते . गावोगावचे लोक व पाहुणे येतात. हि नळयोजना बंद असल्यामुळे सगळ्यांची आबाळ होते. तसेच पिण्याच्या पाण्याचे इतर साधने उदा. हापशी, विहिरी ह्या खोल गेलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या हि हिवाळ्यातच जाणवायला लागली आहे. जर हि समस्या हिवाळ्यातच तोंड वर काढत असेल तर उन्हाळ्यात काय परिस्थिती होणार याचा विचार गावकर्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून याकडे शासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. 
विनोद नंदागवळी मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा