थंडी ऊन वारा पावसाळा याला कधी न जुमानता अंग मेहनत व घाम गाळुन एका दाण्याचे हजारो दाणे निर्माण करणारा या देशातील महान शास्त्रज्ञ म्हणजे शेतकरी आहे मात्र शेतकर्यांचेच हाल होतांना दिसत आहे व शेतकर्यांच्या भरोशावर बुध्दीजिवी लोक मालामाल होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे आपल्या रक्तांचे पाणी करणार्या शेतकरीदादाच्या श्रमाला प्रतिष्ठा ही मिळालीच पाहीजे असे प्रतिपादन हभप शिवदास महाराज श्रृंगारे यांनी आपल्या काल्याच्या किर्तनातुन श्री साईमंदीर बोरगांव मेघे येथे केले आहे शेतकर्यांचा माल जिवनाश्यक म्हणुन गणल्या जातो त्यामुळे शेतमालाचे फारसे भाव वाढवता येत नाही असे
काही अर्थतज्ञ सांगतात आता पर्यतच्या देशाच्या इतिहासात मध्ये महीनाभर कांदे टमाटर खायला मिळाले नाही म्हणुन कुणाचा मृत्यु झाला? असा प्रश्न ही महाराज यांनी उपस्थिति केला. आजारपणात पैशाअभावी औषधि न मिळाल्यामुळे कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले औषधि महाग असल्यामुळे ते घेऊ शकत नाही. अत्यंत जिवनाश्यक औषधि स्वस्त असायला पाहीजे आणि शेतकर्यांनी श्रम करून निर्माण केलेल्या शेत मालाला योग्य दर मिळायला पाहीजे असे आपल्या किर्तना प्रसंगी ते बोलत होते
सम्राट टाईम्स


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा