गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

गावकऱ्यांच्या पुढाकाराने मंदिराचा जीर्णोद्धार



सतीश गाभने
पिंप्री सरहद्द येथे  प्राचीन बैजी मातेचे प्राचीन  मंदिर आहे.पिंप्री गावात  बैजीमातेचे दर्शन घेऊनच शुभ कार्यास सुरुवात केली जाते  आजमितीस  मंदिर जीर्ण झाले आहे.गावकर्याच्या पुढाकाराने मंदिराचा जीर्णोद्धार करावयाचे ठरविण्यात आले .त्यामध्ये प्रामुख्याने ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी जमा करून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. दिनांक१६/११/२०१७ रोज गुरुवारला श्री.मधुकरराव साळवे यांचे शुभ हस्ते भूमिपुजन  करण्यात आले. याप्रसंगी पंजाबराव देशमुख, शंकरराव गवळी,भाऊराव देशमुख,धोंडजी ठोकरे,भागवत गाभने, प्रसन्नजित देशमुख सतीश गाभने, बबनराव गवळी, गजानन काळे, गजानन नाईकवाडे,अभिमन्यु साळवे,सखाराम तायडे,संजय साळवे, आत्माराम काळे, प्रभाकर नाईकवाडे, असिफ खा, मोठ्या संख्येने गावकरी उपस्तीत होते.

*सतीश गाभणे*
*मो,9511420333*
*पिंप्री सरहद्द*✍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा