मंगरुळपीर येथे अवैध लाकुड आणी मूरुम तस्करावर महसुल विभागाची कारवाई
सर्रास गौणखनिज आणी अवैध लाकुड वाहतुक होत असल्याचे ऊघड
मंगरुळपीर-येथील परिसरात सर्रास महसुल विभागाच्या नाकावर टिच्चुन रोजच राजरोसपणे अवैध लाकुड,रेती,मुरुम आणी गौण खनिजांची वाहतूक आणी चौरी होत असल्याने यावर आता जिल्हाधिकारी यांनीच विषेश पथकामार्फत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यात पाहीजे असा गौणखनिजांचा साठा नाही आणी जे आहे त्याचेही चोरट्या मार्गे ऊत्खनन करुन अवैध वाहतूक करन्यास रेती आणी लाकुड तस्कर चांगलेच पटाईत आहेत.याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही काहींनी तक्रारी केल्याचे समजते.तसेच या तस्करांना रोखन्याच्या कारवाईचे आणी महसुल गोळा करन्याचे टारगेट तालुक्यातील महसुल विभागाला मिळत असल्याने अशांवर कारवाई केली जाते.दि.१६ रोजी आसेगाव परिसरातुन अब्दुल रिझवान अब्दुल गणी नामक व्यक्तीचे ट्रॅक्टर अवैध मुरुम वाहतूक करतांना येथील नायब तहसिलदार सागर कुलकर्णी यांनी पकडले असुन सबंधितांकडुन ८८०० रुपये दंड वसुल करन्यात आल्याची तसेच मंगरुळपीर शहरातुनच लाकुड तस्कर करणारे ट्रक्टरही मंडळ अधिकारी वाडेकर यांनी पकडले असुन सबंधित ट्रक्टर मालकाकडुन दंड वसुल करन्याची प्रक्रीया सुरु होती.अशाप्रकारे अधुनमधुन अवैध गौणखनिज आणी लाकुड पस्करावर कारवाया करुन हजारो रुपये दंड येथील महसुल विभागाने वसुल केला आहे परंतु महसूल वसुलीचे टारगेट पुर्ण व्हावे आणी वरिष्टांकडुन वाहवा मिळावी यापुर्तीच कारवाई नको तर या तस्करांचा कायमचा बंदोबस्त करुन फौजदारी गुन्हे दाखल करुन या गौणखनिज तस्करीला येथील महसुल विभाग सपशेल अपयशी होत असल्याची चर्चा आहे.स्वतः जिल्हाधिकारी यांनी यासबंधी दखल घेवून कर्तव्यात कुचराई आणी फक्त थातुरमातूर कारवाई करणार्या अधिकार्यांवर लक्ष ठेवन्याची गरज असुन अशा कारवाया अधुनमधुन होत आहेत यावरुन अवैध गौणखनिज आणी लाकुड तस्करी सर्रास होत असल्याचे अधोरेखीत होत असल्याने आता वरिष्ठांनी कारवाई करुन तालुक्यातील चोरट्या मार्गाने होणारी रेती मुरुम आणी लाकडाची वाहतुक थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा