सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त मालेगांव मध्ये भव्य आदिवासी रँलीचेे आयोजन



क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 142 व्या जयंती निमित्त 15/11/2017 रोजी मालेगांव येथे भव्य आदिवासी रँलीचे आयोजन करण्यात आले असुन या रँलीकरीता गावागावातुन मोठ्याप्रमाणात महीला, पुरूष, विद्यार्थी ,विद्यार्थीनीनी सर्व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते व सर्व संघटनानी उपस्थित राहण्याचे व आपल्या जवळील सांस्कृतिक साहित्य सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे  रँलीची सुरूवात ही  मुंगसाजी महाराज काँलीनी अकोला फाटा येथुन होणार असुन  रँलीचा समारोप हा श्री सत्यसाई मंदिराच्या जवळ शेलुफाटा येथे करण्यात येणार आहे भव्य आदिवासी रँलीला मार्गदर्शण करण्यासाठी  परभणीचे तज्ञ मार्गदर्शण म्हणुन प्रा. राजेश धनजकर  हे उपस्थित राहणार आहेत अशी माहीती आयोजकांनी दिली आहे.

सम्राट टाईम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा