मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार



अकोली फाटाजवळील घटना 


कामरगांव आज दि 14/11/17 रोजी सकाळी 5 : 00 वाजता च्या सुमारास कारंजा  अमरावती मार्गावर अकोली फाट्याजवळ दुचाकी एम एच 37 के 9860 ने म्हसला येथील युवक सुमेध मधुकर थोरात वय 28 वर्ष हा धनज येथे जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा घटना स्थळीच मृत्यु झाला आहे घटनेची माहीती मिळताच म्हसला येथील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहीती कामरगांव पोलिस चौकी व धनज पोलिस स्टेशन ला घटनेची माहीती दिली मात्र पोलीस कर्मचारी  दोन तासाच्या वर कालावधी होऊनही पोलिस घटना स्थळी पोहचले नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थामध्ये पोलीसा विरूध्द संतापाची लाट दिसुन आली.अशा घटने मध्ये पोलिस कर्मचारी कामचुकार पणा करत असल्यामुळे पोलिस प्रशासना विरूध्द तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे तरी वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. 

विनोद नंदागवळी कामरगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा