मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

कृषी प्रदर्शनीत मालेगाव तालुक्यातील भा ज प कार्यकर्त्यांची ना.गडकरीशी चर्चा.....


 मध्य भारतातील  सर्वात मोठी कृषी प्रदर्शनीत मालेगाव येथील भा.ज प . कार्यकत्यांची ना.नितीनजी गडकरी  चर्चा करण्यात आली
गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने केंद्रीय  मंत्री नितीनजी गडकरी मुख्य प्रवर्तक  असलेल्या  नागपूर येथील कृषी प्रदर्शनाला भा ज प चे युवा नेते राजू पाटील राजे व भा ज पा चे प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत यांच्या नेतृत्वात  तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकरी व भा ज प चे  कार्यकर्त्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन तेथे उपस्थित अनेक शेती तज्ञा सोबतच ना. नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्य मंत्री ना.हंसराज  अहिर, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ना.पाशा पटेल भा ज पा.प्रदेश सरचिटणीस डॉ.रामदासजी आंबटकर यांच्या सह पूर्ती, महिंद्रा,अंकुर , जैन  इरिगेशन च्या अनेक त ज्ञा
 सोबत अत्याधुनिक  शेती व शेती विषयात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन घेतले 
 ना.नितीन गडकरी यांचे ध्येय असलेल्या विदर्भ श्वेतक्रांती बाबत राजू पाटील राजे व गोपाल पाटील राऊत यांनी  सविस्तर चर्चा केली.विदर्भातील शेतकऱयांच्या आर्थिक  प्रगती साठी जो पर्यंत जोड  धंद्याची साथ मिळणार नाही तो पर्यंत तो शेतकऱ्यांची प्रगती व विकास होणार नाही त्या साठी शेतीला पूरक  अश्या दूध उत्पादन शेतकऱयांनी घेतले पाहिजे त्या साठीच येत्या वर्षभरात विदर्भातील दूध उत्पादन वाढवून विदर्भात श्वेतक्रांती आणण्याचा निर्धार ना .गडकरी यांनी केला आहे . या श्वेतक्रांती मध्ये वाशीम जिल्ह्यला प्राधान्य  द्यावे कारण वाशीम जिल्हा अति  मागास  आहे .येथील शेतकऱयांच्या आर्थिक प्रगती साठी वाशीम जि.ला  प्राधान्य द्यावे अशी  विनंती केली व ना.गडकरी यांनी सुद्धा संपूर्ण सहकार्य  करण्याचे आश्वासन या वेळी दिले.
यावेळी राजू पाटील राजे भा ज प नेते गोपाल पाटील राऊत , जि.प.सदस्य मो.इमदाद, पं.सं.गटनेते उद्धव राऊत, पं.स.सदस्य संजय देशमुख.जि.सरचिटणीस नितीन काळे, कृ.ऊ बा.स.संचालक  अमोल लहाने ,पंडितराव लांडकर , मालेगाव युवा मोर्च्या अध्यक्ष तेजस आरू, सुरेश पाटील , बबन  पावडे  , प्रवीण चोधरी , विजय भुरकडे यांच्या सह तालुक्यातील अनेक प्रगतशील युवा शेतकरी उपस्थित होते.


सम्राट टाइम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा