| पहा उपोषण कर्ताच्या मागण्या.. |
प्रकल्पग्रस्ताचे
न्याय मागण्यार्थ आमरण उपोषण सुरू
सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मेडशी व गोकसांगवी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने उधर्व मोर्ना प्रकल्पसाठी कवडीमोल भावाने खरेदी केल्या .शेतकऱ्यांना आश्वासनांच्या खैराती वाटल्या त्यांच्या तोंडाला पाने पुसून त्यांना भिकेला लावले. रोजगार मिळविण्यासाठी प्रकल्पग्रस्तानी मत्स्य सहकारी संस्था काढण्यासाठी सहाय्यक निबंधकाकडे रीतसर अर्ज केला. खासदार यांनी प्रकल्पग्रस्ताच्या उरी बाण मारला अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला.प्रकल्पग्रस्त नसणारे धनाढ्य यांना संस्था मिळवून दिल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तानी केला आहे .एक खासदार प्रकल्पग्रस्ताच्या मुळावर उठल्याने जनतेत संताप व्यक्त केल्या जात आहे . प्रकल्पग्रस्तानी खासदारांच्या विरोधात भावना मत्स्य संस्थेत सभासद म्हणून घेण्यासाठी एल्गार पुकारला आहे न्याय हक्कासाठी आजपासून लेकराबाळासह जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे
शासनच जर प्रकल्पग्रस्तावर अन्याय करत असेल तर न्याय तरी कोणाला मागावा असा टाहो प्रकल्पग्रस्तनी फोडला आहे
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा