बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

आदिवासी चळवळीत डॉ आंबेडकर चळवळीतील एकनिष्ठ -त्यागी माणसं हवी-प्रा धनसकर.





आदिवासी समाजाला आद्य क्रांतीकारकांचा इतिहास आहे . आद्य  क्रांतीकारक बिरसा मुंडा यांनी देश स्वातंत्र्यासाठी दुहेरी लढा उभारला  देश स्वातंत्र्या सह आदिवासी समाज सेठ,जमीनदार,सावकार ,श्रीमंत यांच्या शोषना पासून मुक्त झाला पाहिजे . बिरसा मुंडा यांचा खरा इतिहास  हा इतिहास प्रस्थापितांनी दडपून टाकला. आदिवासी चळवळीत  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एकनिष्ठ आणि त्यागी माणसं हवी तेव्हाच आदिवासी  चळवळ यशस्वी  होईल असे उदगार प्रा  राजेश धनसकर  यांनी मालेगाव येथे क्रांती विर बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात काढले 
मालेगाव येथे दि 15 नोव्हेंबर ला बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीची सुरुवात  मुंगसाजी महाराज कॉलनी अकोला नाका येथून करण्यात आली .सुरुवातील आदिवासी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . रॅली जोगदंड दवाखाना ,शिवचौक ,पंचायत समिती  रस्त्यावरून बिरसा मुंडा यांचा जयजयकार करत काढण्यात आली. रॅलीमध्ये आदिवासी समाज बांधवासह कलावंत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले .आदीवासी सामाजातील कलावंतांनी आपली कला यावेळी सादर केली . रॅलीचा समारोप शेलुबाजार रोड सत्यसाईबाबा मंदिराच्या परीसरात   करण्यात आला. यावेळी रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी कचरू देवकर होते प्रमुख मार्गदर्शक प्रा राजेश धनस्कर यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून वामन सानप, जिल्हा परिषद सदस्या  रत्नप्रभाबाई घुगे ह्या होत्या तर महादेवराव डाखोरे,काशिनाथ बोके, आनंदराव पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद सदस्य पंचायत समिती सदस्य,ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य,क्रांतीसुर्य बिरसा मुंडा संघटना,आदिवासी महिला बचत गट संघटना,सेवा सहकारी संस्था
अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,आदिवासी श्री हनुमान व्यायाम शाळा संघटना,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटना ,आदिवासी कर्मचारी संघटना,पोलीस पाटील संघटना ,आदिवासी अस्मिता संघटना ,आदिवासी सर्व संघटनेच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाला मुंगळा,सावळद, तरोडा,भौरद, रेगाव,डोंगरकिनही, भिलदुर्ग,धारपिंप्री,चांडस,एकांबा, कळंबेश्वर, वारंगी,उमरवाडी,मेडशी,काळाकामठा,कोलंदर, वाकडवाडी, ब्राम्हणवाडा, मारसुळ ,गांगलवाडी ,भामटवाडी, पिंपरळवाडी, देवठाणा, पांगराबंदी, सोनखास,खैरखेडा, सुदी,डव्हा,नागरतास, खिर्डा, जऊलका, वडी, धमधमी,अमानवाडी, मुसळवाडी, माळेगाव, धरमवाडी,पिंपळशेंडा,रामरावडी, कुत्तरडोह,अवरदरी ,कवरदरी,वरखुर्द,जोगलदरी ,किन्हीराजा, मैराळडोह,एरंडा, बोराळा, जामरुण वाडी,हनवतखेडा, जामखेड ,पिंपळा,आमखेडा ,बोरगाव,अमानी, शेलगाव इंगोले,गौळखेडा, दुधाळा,सावरगाव बरडे ,अंधारसावंगी,मुंगसाजी नगर,जाम्ब,गणेशपुर,गिव्हाकुटे, उमरवाडी, वसारी, मसला खुर्द, पांगरीकुटे येथील हजारो आदिवासी बांधव रँली मध्ये  सहभागी झाले होते. 

महादेव हरणे 
कार्यकारी संपादक
सम्राट टाईम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा