बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

लोक कलावंताच्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला उत्पुर्त प्रतिसाद ...


विवीध मागण्या चे निवेदण शाषनाकडे पाठविण्याची केली सरपंच उपसरपंच सचीव यांचेकडे केली मागणी

 लोक कलामंच नागपुर शाखा किन्हीराजाच्या वतीने कलावंतांना विवीध सुखसोयी व सवलती मिळाव्या यासाठी स्थानीक ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आज बुधवारला विदर्भ अध्यक्ष दत्तराव धांडे तालुका अध्यक्ष कैलासराव नागरे सह पंधरा ते वीस भजणी मंडळांनी सहभागी घेऊन  शेकडो कलावंतानी सहभागी होवुन आमच्या हक्काच्या मागणी शासना  पर्यन्त ग्रामपंचायत चा ठराव  घेवुन पाठवावी  अशी मागणी यावेळी करण्यात आली  व तसे निवेदण सरपंच वेणुबाई सीताराम जामकर उपसरपंच संजय डिवरे ग्राम विकास अधीकारी भागवत भुरकाडे यांचे कडे  देण्यात आले आहे 


कलावंतानवर समाज सुधारण्याची व जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी असुन समाज जागृती करनाऱ्या कलावंताना रेल्वे व एसटी बसमध्ये मोफत प्रवास द्यावा कलावंतांना प्रतीमहीना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे .कलावंताच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थीक सहाय्य देण्यात यावे .घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा .यासह विवीध मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलण करुन सरपंच वेणुबाई जामकर उपसरपंच संजय डीवरे ग्रामविकास अधीकारी यांना निवेदण देउन मागणी शासना पर्यन्त पोहचवावी अशी मागणी यावेळी कलावंतानी केली .तर यावेळी संत सखुमाता महीला भजणी मंडळ ,शीवशंकर महीला भजनी मंडळ,श्री गुरुदेव सेवा महीला भजणी मंडळ ,मुंगसाजी महाराज  एकतारी भजणी मंडळ सेवालाल महाराज भजणी मंडळ सह विवीध भजणी मंडळांनी एकञ येवुन एक दिवसीय धरणे आंदोलन केले.या धरणे आंदोलनाला माजी जी प अध्यक्ष दिलीपराव जाधव ,प्रदेश अध्यक्ष दत्तराव धांडे यांचेसह वीवीध मान्यवरांनी धरणे आंदोलनाला भेट देवुन कलावंताच्या मागणीला पाठींबा देवुन तुमच्या हक्काच्या मागणीसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहो कलावंतांच्य हक्काच्या मागणीसाठी आपन सदैव आपल्या सोबत असुन कलावंताच्या न्याय हक्कासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे अशी माहीती यावेळी दि अकोला जील्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव यांनी दिली दर तुमच्या हक्काच्या मागणीसाठी लवकरच जनआंदोलन उभारु अशी माहीती यावेळी दत्तरावजी धांडे यांनी दिली यावेळी प्रत्येक भजनी मंडळातील अघ्यक्ष शालुबाई गोंडाळ रमाबाई घुगे शोभाबाई सोनुने शोभाबाई भुजबळ सवीताबाई नखाते सुनीताबाई पटोकर रुख्माबाई नाईक चंद्रकला गोदमले फुलसींग पवार शीवचंद राठोड यांच्या हस्ते नीवेदन देण्यात आले यावेळी उद्धव गोडे रामराव घुगे अजय व्यास पवण इंगळे मुरलीधर धन्तुरे संदीप खुरसडे अमोल जाधव गजानन खंडारे  यानीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

सम्राट टाईम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा