बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

उकळी पेन ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच निष्काशीत....


👉 मुख्य आयुक्त अमरावती यांचा आदेश 

उकळी पेन :- ग्रामपंचायत सरपंचा सौ. मंगला नारायण खोडके व उपसरपंच गोवर्धन अभिमान चव्हाण हे उकळी पेन ग्रामपंचायत मध्ये अतिशय निष्क्रिय असल्यामुळे , भ्रष्टाचारी असल्यामुळे त्यांना पदावरून तत्काल खारिज करण्यात आले आहे , असा आदेश मुख्य आयुक्त अमरावती विभागीय यांनी काढले आहे.
तसेच सदस्य व सचिव यांना सुद्धा धारेवर धरण्यात  आले आहे ,जिल्हा परिषद अधिकारी यांच्या माहितीनुसार मुख्य  आयुक्त अमरावती यांनी हे आदेश दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यानंतर गावात निवडणुका कधी लागणार अशी कमालीची उत्सुकता ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे , अशा भ्रष्ट सरपंच / उपसरपंचामुळे अनेक दिवसापासून विकास हरवला असल्याने मुख्य आयुकाचा आदेश प्राप्त होताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले आहे.
सदर आदेशाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे ,हा आनंद ग्रामस्थांनी फटक्यांची आतिशबाजी करुन साजरा करीत आहेत.
याचे कारण असे की , एक महिन्यापूर्वीच वाशिम येथील सम्बन्धीत उपजिल्हाअधिकारी यांनी उकळी पेन ग्रामपंचायत ब्लॅकलिस्ट मध्ये का टाकण्यात येऊ नये ! व तसे पत्र पंचायत समिती वाशिम चे बी.डी.ओ. यांना पत्राद्वारे देण्यात आला होता परंतु ग्रामस्थांनी उकळी पेन गाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याएवजी सम्बन्धीत दोषी सरपंच , उपसरपंचा विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्या मागणीचे औचित्य साधून सम्बन्धीत अधिकारी वर्गानी दोषीवर कारवाई करून सरपंच / उपसरपंच हे ग्रामपंचायत चालविण्यास सक्षम नाहीत ,असे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे.
सम्राट टाईम्स 
सुरेश इंगोले
8830966982

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा