बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

*निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचे खांडेपालट करणार - युसुफ पुंजानी*





भारिप बहुजन महासंघामध्ये निष्क्रियपणे काम करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे लवकरच खांडेपालट करु. तसेच त्याजागी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजांनी यांनी दिली. कारंजा येथील पुंजांनी कॉम्प्लेक्स मधील उपजिल्हा कार्यालय येथे दि.२८ नोव्हेंबर रोजी आयोजीत समीक्षा बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते.

     “पक्षाचे लेटरहेड केवळ नवापुरते ठेवू नका. ज्यांना पक्ष संघटनेचे काम करायला वेळ नाहीत, त्यांची आता गय केली जाणार नसल्याचे सांगत, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचा फेरबदल करण्याचा इशाराही पुंजानी यांनी दिला आहे. ‘समतामूलक’ समाज निर्माण करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. सर्व समाजांमध्ये-जातीधर्मामध्ये ‘भाईचारा’ निर्माण झाल्याशिवाय असा समाज निर्माण होणे शक्यच नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील समानतेवर आधारित समाज निर्माण करणे म्हणजेच भारिपचे सोशल इंजिनिअरिंग आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आम्ही आधी पक्ष संघटनेत केला. आणि त्यानंतर नगर परिषद, ग्राम पंचायत निवडणुकीत करून यश मिळविला.भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचे जिल्ह्यात जाळे असल्यामुळे त्याचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीत पक्षाला फायदा होणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी केला. मात्र पक्षाचे हित लक्षात घेता निष्ठावान कार्यकर्त्याची मजबूत फळी निर्माण करने आवश्यक आहे आणि या साठी वेळ प्रसंगी कार्यकारिणी मध्ये फेरबदल करण्याची गरज भासल्यास ती सुद्धा करण्याची शक्यता पुंजानी यांनी दर्शविली. निष्ठावान कार्यकर्त्ता ही काळाची गरज असून बहुजनांच्या हितासाठी कार्य न करणाऱ्यांना पक्षामधून पदमुक्त करू असे संकेत त्यानी दिले. ज्यांना केवळ पदाची ऊब घ्यायची आहे, त्यांना आता पदमुक्त करण्याची वेळ आली असून, नवे चेहरे पक्षात सक्रिय केले जाणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य बैठकीत केले. पुंजानी यांच्या या वक्तव्यांमुळे  जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच कार्यकारिणी मध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आयोजित समीक्षा बैठकीला नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


*‘ऑपरेशन क्लीन’* 

*भारिप बहुजन महासंघाने सध्या ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू केले आहे. ‘नॉन परफॉर्मर’ पदाधिकाऱ्यांचे लवकरच फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी दिली आहे
 विनोद नंदागवळी, (9673954516)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा