वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचा उपक्रम
महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
: दि.28 क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार करून समस्त बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे खरा शिक्षक दिन महात्मा फुलेच्या नावानेच साजरा करण्याची गरज लक्षात घेऊन आज दि.28 नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने वाशीम व रिसोड तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयात जावून शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्थानिक कार्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील शाळा व महाविद्यालयामध्ये जावून 28 नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन असून तो आपल्या शाळा महाविद्यालयातमध्ये साजरा करावा असे सांगण्यात आले व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनानिमित्त गुलाब पुष्प व पुस्तके व ग्रंथ भेट देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी,रिसोड तालुकाध्यक्ष ऋषीकेश देशमुख, उपाध्यक्ष अक्षय देशमुख,देवाभाऊ बरडे,शंकर इढोळे व वीभविप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा