उकळी पेन :- येथून जवळच सोनगव्हाण येथे त्रिपिटक नवयुवक विद्यार्थी संघाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच राजेश मस्के तर प्रमूख पाहुणे म्हणून गावचे प्रतिष्ठित नागरिक राध्येशाम गोदरा , सखाराम पट्टेबहाद्दुर , प्रभु कांबळे ,सुभाष उगले , पंडित जाधव , केशव जाधव , व गणेश गावंडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यानी आपल्या भाषणातून देशासाठी संविधानाची गरज यावर मार्मिक असे महत्वपूर्ण विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन त्रिरत्न पाईकराव ,अनुमोदन प्राणजय भीसे तर आभार प्रदर्शन सूरज पाईकराव यानी केले.
कार्यक्रमा अगोदर गावातून भव्य संविधान रैली काढन्यात आली.
वरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिपिटकनवयुवक विध्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश पड्घान, उपाध्यक्ष शुभम जाधव , सचिव अंबादास पड्घान , त्रीरत्न पाईकराव , सूरज पाईकराव , वैभव डोंगरे , संदीप गायकवाड , अजय जाधव , रोशन इंगळे , संकेत पाईकराव , संघपाल जाधव , राजेंद्र गायकवाड , संदीप पडघान , रविकरण पाईकराव , सूरज जाधव , निलेश वाकळे ,योगेश पठाडे , शिवाजी हाट्कर , धम्मपाल पड्घान यांनी अथक परिश्रम घेतले.
सम्राट टाईम्स
सुरेश इंगोले
8830966982

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा