शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

लेडी सिघमचा दरारा संपला का ? रिसोड येथे अवैध धंदे झाले सैराट



सम्राट टाइम्स लाईव्ह

वाशिम जिल्ह्यातील  मराठावाडा हद्दीवर वसलेले  राजकीय पंढरी म्हणून महाराष्ट्रात  सर्व दूर परिचित असलेले तालुक्याचे ठिकाण  रिसोड गाव ! गावाला मात्र सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांनी विळखा घातला आहे. चोहो बाजूनी अवैध प्रवाशी वाहतुकीला उधाण आले आहे. पोलीस यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावरून खिशात हात घालून बसली आहे हेच कळायला मार्ग नाही  वाशिम,हिंगोली मालेगाव मेहकर लोणार मार्गावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असताना कर्तव्यावर  असलेले पोलीस अदृश्य होतात तरी कुठे? हे एक कोडेच आहे . पोलीस स्टेशन चा  कारभार रामभरोसे  सुरू आहे . शहरात ,चौका चौकात फेरफटका मारल्यास शहरात सर्वत्र बेशिस्तिचे वातावरण पाहायला मिळते . रिसोड राजकारणासह अवैध  धंद्याचे केंद्र बिंदू ठरले आहे .चोहोबाजुनी  बेशिस्तीत अवैध  प्रवाशी वाहने राजरोसपणे चालविली जात असताना सर्व सामान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे  .अवैध प्रवाशी वाहनांनी  शहरातील  सर्वच दळणवळणाच्या रस्त्यासह बस स्थानकात अतिक्रमण केले आहे बस स्थानक आहे की ऑटो स्टँड हे ही कळायला मार्ग नाही बस बसस्थानक मध्ये  मध्ये  शिरताच आँटो बसच्या आडवे होतात  अगदी समोर उभे राहून प्रवाशी  शोधतात. बस स्थानकासमोरील रस्त्यावर अनेक अवैद्य प्रवासी वाहने गर्दी करत असल्याने बस ला बस स्थानकात प्रवेश करताना कसरत करावी लागत आहे .अधिकारी हे  राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर तर काम करीत नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे विद्यमान खासदार ,आमदार  ,माजी मंत्री,माजी खासदार , माजी आमदार  जिल्हा परिषद अध्यक्ष ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ,जिल्हा परिषद सभापती अनेक पक्षाचे  जिल्हाध्यक्ष रिसोड  गावाचे असल्याने राजकारण प्रशासनाला  शिरजोर ठरत आहे काळीपिली टॅक्सी ,आँटो सह अनेक विनापरवाना वाहने अवैध प्रवाशी वाहतूक करताना दिसत आहे  शेळ्या ,मेंढ्या , कोंबड्या प्रमाणे प्रवाशांना कोंबून वाहतूक केली जात आहे काही प्रवाशाना मागे लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचा ठेका उचलणारी  पोलीस यंत्रणा गेली तर कुठे ? असा प्रश्न  जनतेला पडला आहे .लेडी सिंघम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रुजू होताच सर्वच प्रकारचे अवैद्य धंदे हद्दपार केले. मिडियानेही त्यांना डोक्यावर घेतले .कालांतराने परिस्थिती जैसे थे झाली .पाणी कुठे तरी मुरले  हळूहळू बंद झालेल्या सर्वच प्रकारच्या अवैद्य धंद्यांनी डोके वर काढले .अवैध धंदे नव्या जोमाने पुन्हा फोफावले   .गोरगरिबांचा संसार उध्वस्त करणाऱ्या अवैद्य धंद्यातून येणारी कमाई कोणाच्या घशात जाते आणि कोण संरक्षण देतो हा संशोधनाचा विषय आहे. येथे राजकीय पुढारी आणि प्रशासनाची मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न निर्माण  झाल्याशिवाय राहत नाही .पोलीस अधीक्षक  लेडी सिंघमचा दरारा तर संपला नाही ना  असा  सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे 
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा