सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम जिल्ह्यात लेडी सिंघम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अवैद्य धंदे हद्दपार केले कारंजा येथे ऑनलाईन जुगार अड्ड्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी
ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धडक कार्यवाही केल्याने अवैद्य ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यात धडकी भरली आहे .स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
कारंजा शहरातील आंबेडकर चौकात ओम बियर शॉपी लगत असलेल्या अवैद्य ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा घातला .जुगार चालविणारा प्रतीक अनिल शिवहरे वय 21 वर्ष याच्या सह सलीम मदार मटेल वय 23 वर्ष,चट्टू नंदा नंदवाले वय 28 वर्ष, विठ्ठल माणिकराव धोकमोळे वय 32 वर्ष, शरद गजानन पवार वय 25 वर्ष,पीरु हसन पप्पूवाले वय 23 वर्ष, सर्व राहणार कारंजा यांना रंगेहात जुगार खेळताना पकडण्यात आले त्यांच्या कडून नगदी 22 हजार 330 रुपये ,संगणक संच,3 मोबाईल,व इतर साहित्य असा एकूण 48 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैद्य ऑनलाईन जुगारावर वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच कार्यवाही करण्यात आली .सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश डुकरे पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरणकुमार साळवे ,पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण,पोलीस नायक प्रेम राठोड,पोलीस कर्मचारी रवी घरत, राजू राठोड,बालाजी बर्वे, चालक थोरवे यांनी केली
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा