शेळीचे पिल्लू पिते गाईचे दूध
👆पहा व्हिडीओ👆
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या मुंगळा या गावात शेळीचे पिल्लू चक्क गाईचे दूध पित आहे आणि गायही तेवढ्याच मायेने त्या पिल्लाला दूध पाजत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे . मुंगळा येथील बाबुराव कुटे यांच्या शेळीने 20 दिवसांपूर्वीच एक पिल्लाला जन्म दिला. रमेश पौळकर यांच्या गाईने 6 दिवसांपूर्वीच एका वासराला जन्म दिला ,.दोघे शेजारी आहेत बाबुराव पौळकर यांनी सकाळीच गाय गोठ्यातून काढून बाहेर बांधली वासरु गाईचे दूध पित असल्याचे शेळीच्या पिल्लाने पाहिले आणि तेही वासरासह गाईचे दूध पिऊ लागले .गाईने कोणताही भेदभाव न करता शेळीच्या पिल्लालाही मायेने दूध पाजले. शेळीच्या पिल्लाचा हा नित्यक्रमच झाला .गाय दररोज मायेने दोघांना दूध पाजत असल्याने हा गावकाऱ्यासाठी कुतूहलाचा विषयी ठरला आहे
राजेश अनंत कुटे मुंगळा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा