कारंजा तालुक्यातील गाव बेंबळा येथे जलस्वराज्य प्रकल्प बिल न भरल्यामुळे बंद पडलेला आहे. आज पाहता पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पावसाळा कमी झाला त्यामुळे विहिरींना पाणी नाही. पाण्याची साधने हि व्यवस्थित नाही. त्यात बेंबळा या गावी जलस्वराज्य प्रकल्प उभारला गेला होता परंतु अध्यक्षानी बिल न भरल्या मुळे हि योजना बंद पडलेली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न बेंबळा गावातील रहिवाश्याना भेडसावत आहे. हि योजना अनेक गावामध्ये सरकारने उभारलेली आहे. परंतु अशाच काही कारणास्तव त्या हि बारगळलेल्या आहेत. याची सरकारने नोंद घ्यावी.
बेंबळा या गावाची लोकसंख्या २०००एवढी आहे या लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न कुणीच करत नाहीये. याची दखल सरकारने ग्यावी. अशी नागरिकांची अपेक्षा व मागणी आहे.
विनोद नंदागवळी
मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा