👆👆 Live video 👆👆
विनोद तायडे
डिजिटल युगात पत्रकारितेची भाषा बदलत असून पत्रकारिता अभ्यासक्रम कालबाह्य झाला आहे .मोबाईल एक नवा प्लॅटफॉर्म आहे त्या माध्यमातून प्रेक्षक सोशल मीडियाशी जोडल्या गेला आहेत . दीर्घकाळ पत्रकारीता करू इच्छिणाऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून त्या दिशेने काम करणे गरजेचे आहे. वेब काळाची गरज असल्याचे मत एबीपी चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या वतीने पुणे येथील सिद्धार्थ हॉल मध्ये आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने इंडिया जर्नालिस्ट वृत्तवाहिनी , पत्रकारिता कोर्सेस शुभारंभ आणि महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन पुणे येथील सिद्धार्थ हॉलमध्ये नुकतेच संपन्न झाले कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ,माजी वनमंत्री पतंगराव कदम,सिने अभिनेता राहुल सोलापूरकर ,जेष्ठ पत्रकार वआज बाविस्कर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे,जेष्ठ पत्रकार गोविंदराव घोळवे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे सांस्कृतिक विभागप्रमुख संदीप भटेवरा,प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील निवडक पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्तविक विश्वासराव आरोटे यांनी केले सुत्रसंचालन अनिल राहणे तर आभार उमेश कुलकर्णी यांनी मानले
विनोद तायडे
सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा