=========================
पूर्णा (राजेश वालकर )
मागील काही दिवसांपासून पुर्णा शहरात राजरोस पणे चोरट्यांनी उच्छांद मांडला असून मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळाचे सत्रच सुरू आहे मध्यरात्री पूर्णा शहरातील विजय नगर भागात राहणाऱ्या परभणी महापालिकेच्या एका महीला कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड शहानवे हजार पाचशे रुपये किमतीचा माल लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
पोलीसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार शहरातील विजय नगर भागात राहणाऱ्या परभणी महापालिकेच्या कर्मचारी रइसा बेगम शे.अकबर वय ३९ वर्षे या २८ नोव्हेंबर रोजी महापालिकेची ड्युटी संपवून परभणी येथून पुर्णेला आल्या आपल्या राहत्या घरी जेवण करून खोलीला कुलूप लावून जवळच असलेल्या खोलीत जाऊन मुलाबाळांना घेऊन झोपलेल्या असताना दि २८ नोव्हेंबर च्या मध्यरात्री त्यांच्या घरी बाजूच्या खोलीत अज्ञात चोरट्यांनी घरातल्या खोलीचे कूलूप तोडून आत प्रवेश केला सुटकेस खाली पाडून सुटकेस चे कुलूप तोडले व त्यातील ६२५००रू किंमतीचे सोन्याचा नेकलेस,१२५०० रूपयांची सोन्याची माळ २०तोळे ८ हजार रूपयांचे चांदिचे पैंजण ,१५६०० रुपये रोकड असा एकूण ९८६००रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घटना घडल्याचे सकाळी समजल्यानंतर या घटनेची माहिती पूर्णा पोलीसांना देण्यात आली.त्यानंतर पुर्णा पोलीसांनी त्या महीलेच्या तक्रारी नुसार अज्ञात आरोपी विरोधात गुरनं २४२/१७कलम ३८०,४५७अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान मंगळवारी सकाळी पोलीसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणी येथील श्र्वान पथकास प्राचारण केले परंतू त्या श्वानालाही चोरट्यांचा सुगावा लागला नाही.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सय्यद मोईन हे करित आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा