रिसोड :- गत तीन वर्षा पासून सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतिने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार 30 नोहेंबर रोजी रिसोड राकाँचे तालुका
अध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्या नेतृत्वात बाबाराव खडसे ऑफिस
येथून तहसील कचेरीवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
युती सरकारने पोकळ आश्वासने देऊन राज्याच्या जनतेची फसवनुक केली आहे. राज्यातील शेतकरी,कष्टकरी, कामगार, लहान व्यवसाईक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच वर्गात या सरकार बद्दल तिव्र असंतोष निर्माण झाला असल्याने तसेच सरकारच्या नोटा बंदी व जी एस टी आताताई निर्णयाने देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पुर्ण पणे कोलमडून गेल्याने आणि आत्महात्या हा विषय आता शेतकरी व शेतमजुरांच्या पुरता सिमित न राहाता ईतर अनेक क्षेत्रात ही कोंडीत सापडलेले सामान्य नागरीक आत्महात्ये साठी प्रवृत्त होतील अशी परिस्थिती युती शासनाने निर्माण केल्याचा आरोप करत राकाँच्या वतिने राज्यभर जिल्हा कचेरी आणि तालुका कचेरीवर 'हल्लाबोल' आंदोलन करण्यात येत असल्याने राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जन विरोधी कारभारा निषेधार्थ राकाँ तालुका अध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्या नेतृत्वात येथिल तहसील कचेरीवर सकाळी ११ वा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या वेळी शेतक-यांची संपुर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा, कापसा वरील बोंडअळी मुळे नुकसानी पोटी एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतक-यांचे विज कनेक्शन तोडू नये, विमा ताबडतोब देण्यात यावा, पाथरी तालुका दुष्काग्रस्त जाहिर करावा, गॅस व इंधन दर वाढ ताबडतोब थांबवण्यात यावी , तुर,कापुस सोयाबीन पिकांचे खरेदी केंद्र रिसोड येथे सुरू करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात येणार आहे हा बाबाराव खडसे यांच्या ऑफिस
सकाळी ११ वा गुरुवार 30 नोहेंबर रोजी निघनार आहे या मोर्चात हजारोंच्या संखेत उपस्थित राहाण्याचे आवाहन राकाँच्या वतिने प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
महेंद्रकुमार महाजन
रिसोड
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा