शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

कसबेतडवळ्याचे सुरेश पाटिल यांच्या पँनलचा धूमधडाक्यात प्रचार सुरू







उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतची रणधूमाळी सुरु आसून यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे  निवडणुकीत एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या नेत्रत्वाखाली  ग्रामविकास पँनेल तयार केले आसून नुकतेच  प्रचाराचे  नारळ फोडले दरम्यान  शुक्रवारी ता सहा सायंकाळी   रँलीचे व प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते यात सुरेश पाटिल यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते
 कसबे तडवळा येथे  तीन पँनेल तयार झाले आसून यापैकी  सुरेश पाटील यांच्या ग्रामविकास पँनेलच्या प्रचाराचा नारळ फुटला दरम्यान  खंडोबा मंदीर हजरत भैरुल्लाशहा कादरी दर्गा ,अंबाबाई मंदीर श्रिराम मंदीर ,हनुमान मंदीर ,भिम नगरमध्ये समाज,मंदीर यामध्ये नारळ फोडुन प्रचाचा शुभारंभ करण्यात आला
   प्रचारफेरी शिवाजी चौकात आल्यानंतर.प्रचार सभेचे आयोजन,करण्यात आले होते यावेळी व्यासपिठावर सुरेश पाटील,माजी उपसरपंच  विजयसिंह जमाले राजाभाउ लोंढे ,तंटा मुक्त,समितीचे अध्यक्ष सुनिल वळेकर,दिलीप करंजकर, रामचंद्र जमाले भारत होगले ,रामचंद्र धनके, संतोष लोंढे,शाम पवार तस, सरपंच पदाचे उमेदवार मन्मथ आवटे व ग्रामविकास पँनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते
      यावेळी प्रस्तावीक विजयसिंह जमाले यांनी केले तर दिलीप करंजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यमान उपसरपंच सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सन २०१२ ते २०१७ या पाच वर्षाच्या कालावधीत,ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये पाणी टंचाई काळात केलेला सुरळीत पाणी पुरवठा गावातील सर्व रस्त्याचे केलेले काँक्रिटीकरण,दुष्काळी परस्थिमध्ये यशस्वीरीत्या उभारलेली चारा छावणी,गावात पुरवलेल्या विविध मुलभुत व भौतिक सुविधा , गावात राबवलेली स्वच्छता मोहीम या विषयी सविस्तर माहीती देऊन भविष्यात गावाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी ग्रामविकास पँनेलला निवडुन द्यावे असे आहवान केले


हुकमत मुलाणी
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा