मानोरा:- तालुक्यातील पंचाळा याठिकाणी डायरिया (अतिसार) ची लागण झाली आहे.त्यामुळे मानोरा येथील ३९ रुग्ण हे दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आहे. दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालय येथे डॉ. श्याम जाधव व डॉ.विरेंद्र अस्वार, डॉ टेवरे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना सलाईन व ओषधी वाटप केले. सध्या मानोरा येथे 90 रुग्ण भरती आहेत.डॉ श्याम जाधव यांनी तातडीने गावातील खासगी डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते यांना ग्रामीण रुग्णालय येथे बोलविले.तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून त्वरित विहिरीचे वाटर सैंपल पाठविले.पंचाळा येथे कॅम्प लावला.
धनंजय राठोड मानोरा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा