सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे गुडमॉर्निग पथकाने उघड्यावर शौच करताना 21 ग्रामस्थाना रंगेहात पकडले .त्यात एका महिलेचा समावेश होता महिलेचे नातेवाईक संतोष महादेव घुगे त्याच्या पत्नीसह मेहुनी या तिघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनला विविध कलमन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी आज दिली याबाबतची तक्रार मालेगाव गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे
मेडशी येथे दि 5 ऑक्टोबर ला सकाळी 5 वाजता गुडमॉर्निंग पथकाने हागणदरीत नाकेबंदी करून 21 महिला पुरुषांना उघड्यावर शौच करताना एका महिलेला रंगहात पकडले सदर महिलेने 1200 रुपये दंड भरण्यास नकार दिला त्याचवेळी संतोष महादेव घुगे आणि त्याच्या पत्नीसह मेहुनीने गुडमॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्याना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली . तिघा विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर प्रकरणाने उघड्यावर शौच करणार्यांत खळबळ उडाली आहे सदर कार्यवाही मालेगाव तालुक्यातील दुसरी कार्यवाही आहे याआधी वडप येथील सरपंच पतीवर कार्यवाही करण्यात आली होती हे विशेष
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा