मानोरा:-तालुक्यातील पंचाळा हे १११० (अकराशे दहा) लोकसंख्येच गाव आहे.जास्त करून या गावात आदिवासी हे लोक वास्तव्यास आहेत.या गावाला लागूनच धरण आहे तसेंच या पूर्ण गावात एकच सार्वजनिक विहीर आहे.त्यावरच या गावातील ८० टक्के लोक हे या विहिरीचे पाणी पितात.हे गाव पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत.हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ४ किलोमीटर व तालुक्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. सदर गावात दिनांक ४ पासून किरकोळ प्रमाणात संडास व उलटीचे रुग्ण होते.दिनांक ५ पासून रुग्ण संख्येत वाढ झाली.त्यामुळे काही रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही रुग्ण तालुक्याचया ठिकाणी पाठविण्यात आले.
त्यामुळे दिनांक ५ व ६ या २ दिवसापासून आरोग्य विभागाचे ४ टीमचे कर्मचारी हे पंचाळा या गावात जाऊन गृह भेटीद्वारे पाणी कशे वापरावे व इतर स्वछता राखावी या संदर्भात माहिती व सल्ला देत आहेत.या गावाला जोडून असणारी जीवन प्राधिकरणाची टाकी ही बंद असल्यामुळे व सार्वजनिक एकच विहीर असल्यामुळे या ठिकाणी लोक हे जीवन प्राधिकरणाचया लिकेज कॉक वरून पिण्यासाठी पाणी भरतात त्यामुळे या ठिकाणी डायरियाची लागण झाली असेल असे बोलले जात आहे.यावेळी आमचे प्रतिनिधी धनंजय राठोड यांनी येथील वैदयकीय अधिकारी डॉ.व्ही.आर.खडसे यांची भेट घेतली व माहिती मागितली असता येथील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांचा योग्य तो उपचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय राठोड मानोरा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा