मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

जिल्ह्यातील अवैध गतिरोधक हटविले जाणार



 सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम, दि. १० : जिल्ह्यात विविध मार्गांवर अवैधरीत्या व चुकीच्या पध्दतीने गतिरोधक तयार करण्यात आले असून त्याचा वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्तावरील अवैध गतिरोधक हटविण्यात यावीत, असा निर्णय आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितेने घेतला. त्यानुसार वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपपणे ही कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, वाहतूक पोलीस शाखेचे श्री. जामकर आदी उपस्थित होते.

अवैध गतिरोधक हटविण्याबरोबरच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी गतिरोधक निर्मिती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने अवैध प्रवासी वाहतूक,  रस्त्यावरील अतिक्रमणे, नो-पार्किंग झोन, जड वाहनास शहरात प्रवेशबंदी, इलेक्ट्रॉनिक सिग्नल, मोकाट जनावरांचा बंदोबस्त आदी विषयांवर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा