मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

माहूर तालुक्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा वरचश्मा. भाजपानेही मारली मुसंडी.


माहूर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील  25 ग्राम पंचायतीच्या  निवडणुका 7 ऑक्टो.रोजी पार पडल्या त्यात शिवसेनेने चांगले यश संपादन केले असून भाजपानेही या निवडणुकीच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखविले आहे.तर रा.कॉ.चे महत्वाचे गड या निवडणुकीत ढासळले असल्याने या पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर दीडशे वर्षाच्या  इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या कॉँग्रेस पक्षाला या स्तरावरील निवडणुक लढण्याची गरजच नाही हे या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा अधोरेखित झाले आहे.
           
             माहूर तालुक्यातील लांजी (रा.कॉ.), ,रूई (भाजपा ), शेकापुर (अपक्ष ), गुंडवळ (भाजपा ), बंजारा तांडा  (सेना ),मछिंद्र पार्डि,(सेना ),कुपटी (रा.कॉ.), मांडवा(रा.कॉ. ),बोरवाडी (रा.कॉ.),पवनाळा ( भाजप  ),वझरा (शेख फरीद )(भाजपा ), हिंगणी (सेना/भाजप  ),दिघडी (कुत्तेमार ) (-),वायफणी (भाजप /सेना ), वानोळा (भाजप ),पाचुंदा ( आघाडी  ),पानोळा(रा.कॉ. ),इवळेश्वर( भाजप ),महादापूर ( रा.कॉ.), लखमापुर (शिवसेना ), मालवाडा (शिवसेना ), तांदळा(रा.कॉ.),दत्तमांजरी (भाजपा ),भोरड (कॉँग्रेस ), व पडसा (सेना )या गावातील 25 गावच्या ग्राम पंचायतीचा निकाल 9 ऑक्टो.रोजी घोषीत झाला.
           या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेल्या यशाने शिवसेना हा पक्ष  गदगद झाला असून शिवसैनिकात उत्साह संचारला आहे,केवळ शहरापुरता मर्यादित म्हणून हिणवला जाणारा भाजप या पक्षाला मिळालेले यश सर्वांसाठीच चिंतेचा विषय  बनला आहे.तर काही महत्वाचे गड गमावल्याने रा.कॉ.पक्षाच्या नेत्यांच्या कपाळावर आठ्या अधिक गडद झाल्या आहेत.50 वर्षापेक्षा अधिक काळ देशावर सत्ता गाजविणा-या कॉँग्रेस पक्षाला अशा छोट्या मोठ्या निवडणुका   लढविण्याची काही गरज नसल्याने त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा