सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे गुड मॉर्निंग पथकाने दि ५ ऑक्टोबर ला सकाळी ५ वाजता २१ लोटबहाद्दर महिला पुरुषाना उघड्यावर शौच करताना रंगेहात पकडले .यातील एका महिलेसह तिच्या नातेवाईकानी पथकातील महिला कर्मचाऱ्याना अश्लील शिवीगाळ केली . शासकीय कामात अडथळा आणला .एका चॅनलने सदर महिलेची बनावट चित्रफीत तयार करून चॅनलवर खोटी बातमी दाखविली. समाजात गुड मॉर्निंग पथकाची मानहानी केली . त्या महिलेने गुड मॉर्निंग पथकावर विनयभंगाची खोटी तक्रार मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल केली . गटविकास अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱयांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तरी खोटे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा हागणदरी मुक्त अभियान कोणताही अधिकारी कर्मचारी सहभागी होणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनने जिल्हाधिकारी, पोलीस अधि्क्षका याना निवेदन दिले आहे.
मेडशी गाव वादग्रस्त गाव असून गावातील काही विकृत लोक प्रशासनाच्या धोरणाला नेहमीच विरोध करतात .मीडिया सुद्धा सूडबुद्धीने समाजात खोट्या बातम्या पसरवत असल्याने शासन अभियानाला खीळ बसली आहे .याचा प्रत्यय मेडशी गावात आला आहे . मेडशी येथे गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौच करणाऱ्या २१ लोटाबहाद्दर महिला आणि पुरुषाना पकडले त्यात एका गर्भवती महिलेचा समावेश होता . लोटाबहाद्दर महिलेने गुड मॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्याना शिवीगाळ केल्याने तिला पोलीस चौकित आणण्यात आले. त्याच वेळी महिलेची बहीण आणि मेहुण्याने पोलीस चौकीत तमाशा केला. कर्मचाऱयांना अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत एका चॅनलच्या प्रतिनिधीने महिलेशी संपर्क साधून बनावट स्टोरी तयार केली. खोटी बातमी प्रसारित केली .एका बड्या वृत्तपत्राने रि ओढली .सत्य उजेडात आणणे मीडियाचे काम असताना मिडियाने प्रशासनाची बदनामी केली. हागणदरी मुक्त अभियानाला सुरुंग लावला . लोटबहाद्दर महिलेने मालेगाव पोलीस स्टेशन गाठून गुडमिर्निग पथकाच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली .ठाणेदाराने शहानिशा न करताच कर्मचाऱयांवर खोटे गुन्हे दाखल केले .मीडियाने खोट्या न्यूज प्रकाशित व प्रसारित केल्या. सोशल मीडियावरून अधिकारी व कर्मचारी यांची बदनामी करून त्यांचे खच्चीकरण केले. सदर महिला भाड्याच्या खोलीत राहत असताना तिचा आलिशान बंगला दाखविला .महिलेला उघड्यावर शौच करताना रंगेहात पकडले. छायाचित्रात तिच्या हातातील टमरेल स्पस्ट दिसत असताना चॅनलने ती रनिंग ला गेल्याचे दाखविले. प्रशासनाजवळ महिले विरोधात पुरावे आहेत तरी गुड मॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अन्यथा कोणताही अधिकारी व कर्मचारी या अभियानात सहभागी होणार नाही असा इशारा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून दिला आहे .
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा