बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

गुडमॉर्निंग पथकावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या महिलेची पोलखोल



विविध संघटनासह महिला संघटना  सरसावल्या 

सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे गुडमॉर्निंग पथकाने 6 ऑक्टोबर ला सकाळी 5 वाजताच्या सुमारास 21 लोटा बहाद्दरावर कार्यवाही केली .यात एक गर्भवती महिलेचा समावेश होता. सदर महिलेच्या बहीण व मेहुण्याने कर्मचाऱ्याना अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामास अडथळा आणला. चोराच्या उलट्या बोंबाप्रमाणे मालेगाव पोलीस स्टेशनला गुड मॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. ठाणेदाराने खोटी तक्रार दाखल करत पथकावर विनयभंगाचा गुन्हे दाखल केले .
एका नामवंत चॅनलने गुड मॉर्निंग पथकाविरोधात शहानिशा न करताच खोडसाळ  बातमी दाखवून प्रशासनाची बदनामी केल्याने कर्मचाऱ्याचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. जिल्ह्यातील गुड मॉर्निंग पथक बंद झाले आहे  .याला जबाबदार असणाऱ्यावर योग्य कार्यवाही झालीच पाहिजे. गुड मॉर्निंग पथकावरील खोटे  गुन्हे मागे घेण्यासाठी राजपत्रित संघटना विविध जिल्हापरिषद संघटनासह महिला मंडळांनी  जिल्हाधिकारी आणी  पोलीस अधीक्षका याना निवेदन  दिले आहे.
मेडशी येथील दक्षता समितीच्या अध्यक्षा प्रियाताई पाठक यांनी सदर महिलेची पोलखोल केली आहे. शारदा सानप ही महिला तिच्या आईसह मेहुणा संतोष महादेव घुगे यांच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहते त्याच्या घरी संडास नाही .त्याच्या घरातील स्त्रिया  नेहमीच उघड्यावर शौचास जातात .
6 ऑक्टोबर ला सकाळी शारदा सानप हिला गुड मॉर्निंग पथकातील महिला कर्मऱ्यानी उघड्यावर शौच करताना रंगेहात पकडले. तिने दंड न भरताचा पोबारा केला. ग्राम पंचायतने दंड भरण्याबाबत नोटीस बजावली असता तिने नोटीस घेण्यास नकार दिला. पत्रकारांना खोटी माहिती दिली .एका नामवंत चॅनल ने खोटी स्टोरी तयार करून चक्क गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याना  खलनायक ठरविले .मीडियाने संतोष घुगेचा भाऊ गजानन घुगे  यांच्या आलिशान बंगल्याच्या वापर बातमीत करून सदर महिला गर्भश्रीमंत असल्याचा  बनाव केला.खोट्या बातम्या दाखविल्याने सदर महिलेच्या नातेवाईकांचे मनोबल वाढले त्यानी थेट मालेगाव पोलीस स्टेशन गाठून विनयभंगाची तक्रार दाखल केली .ठाणेदाराने त्वरित विनयभंगाच्या गुन्हासह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद  केली .हा अन्याय आहे याबाबत मेडशी येथील प्रियाताई पाठक यानी मुख्यकार्यकारी अधिकारी  यांना निवेदन दिले आहे. निवेदनात सदर महिलेची पोलखोल करण्यात आली आहे. 

 गुड मॉर्निंग पथकावरील खोटे  गुन्हे मागे घेण्यात यावे  मेडशी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. 

मेडशी येथे पुन्हा गुड मॉर्निंग पथक कार्यण्वित करण्यात यावेत 
आदी मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत. गुड मॉर्निंग पथकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी 
लवकरच महिला मंडळ  500 सदस्यांच्या सह्यांचे निवेदन पोलीस अधिक्षक यांना देण्यात येऊन खरी परिस्थिती समोर आणणार असल्याचे प्रियाताई पाठक यांनी सम्राट टाइम्सशी बोलताना सांगितले.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा