बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

सेनगांवात गुटख्याची विक्री जोरात; २८ हजाराचा गुटखा पकडला


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:-शासनाकडुन गुटखा बंदी असतांनाही गुटखा माफीया सेनगांव शहरासह तालुक्यात गुटख्याची विक्री जोमात करीत आहेत.दि.१० आँक्टोबंर मंगळवार रोजी रात्री ०९ च्या  दरम्यान एका गुटखा विक्रेत्याच्या ताब्यातुन दोन पोत्यात असलेला २८ हजाराचा गुटखा पोलीस निरीक्षक कारेगांवकर यांनी पकडल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहीती अशी की,सेनगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.मधुकर कारेगांवकर हे दि.१० आँक्टोबंर मंगळवार रोजी रात्री ०९ वाजता पेट्रोलींग करीत असतांना सेनगांव बसस्थानक येथे भगवान ढाकणे याच्याजवळ दोन पोत्यात विविध प्रकारचा गुटखा मिळुन आला असुन त्याची किमंत २८ हजार असल्याची माहीती पो.नि.कारेगांवकर यांनी दिली आहे.अवैध गुटखा विक्रीतून गुटखा माफीनां लाखोची कमाई होत असल्याने हे गुटखामाफीया सेनगांव शहरासह तालुक्यात गुटखा विक्री जोरात करीत आहेत. ढाकणे नामक गुटखा विक्रेत्याला रंगेहाथ पकडल्याने गुटखामाफीयात एकच खळबळ उडाली आहे.संबधीत गुटखा विक्रेत्यावर कार्यवाही करण्यासाठी अन्न व भेसळ अधिकारी यांना माहीती देऊन पुढील कार्यवाही करीत असल्याची माहीती पो.नि.कारेगांवकर यांनी दिली आहे. घटनास्थळी पो.नि.कारेगांवकर, पो.उ.नि.भोसले,पो.उ.नि.तायवाडे,पोलीस कर्मचारी भारती वाघमारे, अश्पाक,धनवे,पाणबुडे हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा