बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

मंगरुळपीर तालुक्यातील साळंबी येथे विज अंगावर पडल्याने सोळा गायींचा मृत्यु

                                            मंगरुळपीर-तालुक्यातील साळंबी येथील शिवारात अचानक विज पडल्याने १६ गायींचा दुर्देवी मृत्यु झाल्याने सबंधित शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.                                   जिल्ह्यात परतीचा पाऊस सध्या थैमान घालत असुन अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले तसेच सखल भागात पाणीही साचले आहे.सुरवातीला पावसाने पाठ फिरवीली पण परतिचा पाऊस मंगरुळपीर तालुक्यात समाधानकारक होत आहे.दि.९ रोजी पावसाने तालुक्यात कहरच केला त्यामुळे मंगरुळपीर शहर जलमय झाले होते.आज झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले.संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या विजेच्या कडकडाटासह आणी ढगांच्या गडगडाटासह पावसाने थैमान घातले त्यातच मंगरुळपीर तालुक्यातील साळंबी येथे गायींच्या अंगावर विज पडल्याने १६ गायींचा मृत्यु झाला.घटनेची माहीती मिळताच मंगरुळपीरचे तहसिलदार वाहूरवाघ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.शेतकर्‍यांच्या सोळा गायी विज पडुन मरण पावल्याने मोठे नूकसान झाले त्यामुळे सबंधित शेतकर्‍यांना महसुल विधभागाने नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.                                                                                 
 फुलचंद भगत
.9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा