शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

" बापू की कहानी जम्बो की जुबानी "



चिमुकल्यानी कृतीतुन साकारले महात्मा गांधी!

सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम
महात्मा गांधी जयंती निमित्य पोदार जम्बो किड्सच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कृतीतुन महात्मा गांधी साकारले होते. यावेळी महात्मा गांधीजीच्या जिवन चरित्र्यावर प्रत्यक्ष विविध कार्यक्रम सादर केले.

शिक्षणासोबत देशातील महापुरूषाची माहिती हसत-खेळत विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दि.४ आॅक्टोंबर रोजी सिव्हील लाइन परिसरातील पोदार जेम्बो किड्स मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुलाना वेशभुषा धारण करून, चित्र काढुन, रांगोळी काढून, कळत न कळत महात्मा गांधीजी विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थीही हसत-खेळत त्यामध्ये सहभागी झाले होते. कृतीतुन बाल वयात विचद्यार्थ्यांच्या महात्मा गांधी विषयी माहिती मिळाली. यासाठी पोदार जम्बो किड्सच्या केंद्र प्रमुख शिक्षिका किर्ती बेदरकर, जया कंकाळ, वर्षा वानखेडे, राणी झोड, प्रिया खुळे यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.                                                  
                                                               
                                                                                                                 हसत खेळत शिकविने सोपे-
किर्ती बेदरकर

*ताण-तणावात मुले शिक्षण घेऊच शकत नाही. शिवाय काळ बदलला आहे काळानुसार अधुनिकतेचा वापर करून कृतीतुनच शिक्षण द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना तनावमुक्त ठेऊन खेळाच्या माध्यमातुन शिकवावे लागत आहे. महापुरूषाचे विचार कृतीतुन त्यांच्या पर्यंत पोहचवावे लागतात. त्यामुळे लहान मुले हे विसरत नाही यासाठी आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो पोदार जम्बो किड्सच्या केंद्र प्रमुख तथा शिक्षिका किर्ती बेदरकर यांनी सांगितले*.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा