गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

मेडशी येथे सोयाबिन हंगामात गुडमाँर्निगपथकाची धडक कार्यवाही



हजारो रुपये दंड वसूल 

विनोद तायडे
वाशिम 

 वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या  मेडशी गावात  सोयाबीन सोंगणीचा हंगाम जोरात  सुरू आहे  .मजूर वर्ग भल्या पहाटे कामास जात आहे .सोयाबीन हंगामाच्या धामधुमीत  गुडमॉर्निग पथकाने उघड्यावर शौच करताना २१ लोकांना रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड वसूल करण्याची  कार्यवाही आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास केली. सदर कार्यवाहिने  गावात एकच खळबळ उडाली आहे .
सद्या मालेगाव तालुका हागणदरी  मुक्त करण्यासाठी पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद वाशिम पथकाने धडक कार्यवाहीचा सपाटा लावला आहे .बऱ्याच गावात हागणदरीत नाकाबंदी करून उघड्यावर शौच करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही केल्याने ग्रामस्थानी गुडमॉर्निग पथकाची धास्ती घेतली आहे .तालुक्यातील मोठे समजले जाणाऱ्या मेडशी गावात गुड माँर्निग पथकाने सर्जिकल स्ट्राईक करत २१  लोकांना उघड्यावर शौच करताना रंगेहात पकडले. एकीकडे सोयाबीन सोंगणीची धामधूम सुरू  असताना मजुरांना पोलीस चौकीत आणण्यात आले. प्रत्येकी १२०० रुपये दंड भरल्याशिवाय कोणालाही सोडण्यात येणार नसल्याची भूमिका मालेगाव गटविकास अधिकारी संदीप  कोटकर यांनी घेतली .दंड न भरण्याऱ्यावर एफ आर आय दाखल करण्याच्या  सूचना कर्मचाऱ्याना दिल्यात .काही लोकांनी गुडमॉर्निग  पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला  .पोलीस चौकीत लोकांनी एकच गर्दी केली. गटविकास अधिकारी संदीप कोटकर आणि जिल्हा परिषद समन्वयक पुष्पलता अफूने यांनी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगताच १४ लोकांनी प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड भरून स्वतःची पोलीस चौकीतून सुटका करून घेतली. ७ लोकांना दंड भरण्यासाठी संध्याकाळ ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली .दंड न भरण्यावर एफ आर आय दाखल करणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी यावेळी सांगितले दंडापोटी    १५ हजार ६०० रुपये रक्कम वसूल करण्यात आली .सदर रक्कम गटविकास अधिकारी यांनी मेडशी ग्राम विकास अधिकाऱ्याच्या सुपूर्द केली
सदर कार्यवाही प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी संदीप कोटकार, जिल्हा परिषद समन्वयक पुष्पलता अफूने,विस्तार अधिकारी सुरेश हाडोळे ,ग्रासमविकास अधिकारी सुडके, स्वच्छ  भारत मिशन विभागाचे दत्ता चव्हाण  सुखदेव पडघान, अभय तायडे, ,बाळू इंगोले आणि ग्रामपंचायत कर्मचारी शेख जावेद,बाळू घुगे ,मुकेश चव्हाण आदींनी केली

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा