रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

भव्य कलश यात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ



ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर जिर्णोध्दार : बाहेती परिवाराचे आयोजन

वाशीम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिराचे जिर्णोध्दार व पुन:स्थापना निमीत्त बाहेती परिवाराच्या वतीने श्री श्री रविशंकर यांची कृपापात्र शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून 1 ते 4 ऑक्टोंबर पर्यंत वर्तमान जीवनावर आधारित श्री हनुमान रामकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.     यावेळी 1 ऑक्टोंबर रोजी स्थानिक मध्यमेश्वर मंदिर येथून नगर परिषद मार्गे शुक्रवापेठ, माहुरवेश पर्यत भव्य 108 कलशधारी महिलांची भव्य कलशयात्रा काढण्यात आली. यामध्ये महिलांनी लाल किंवा केशरी साडी व पुरूषांनी पांढरा पायजमा, कुर्ता  हे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.
    सर्वप्रथम मध्यमेश्वर मंदिर येथे देवी वैभवश्रीजींनी पुजाअर्चना केली. तदनंतर संस्थानच्या वतीने रंगनाथ पांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून माताजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, जमनादास बाहेती, सनदी लेखापाल बालकिसन बाहेती, डॉ. जयकिसन बाहेती, प्रविण बाहेती,  राम बाहेती, गुड्डु बाहेती, व्दारकादास बाहेती, संदीप बाहेती, आर्ट ऑफ लिव्हींगचे विजय चव्हाण, अग्रवाल, सौ. अर्चना मेहकरकर, निलेश सोमाणी समवेत मान्यवरांची उपस्थिती होती. रस्त्यात ठिकठिकाणी भाविक भक्तांनी रांगोळी काढून माताजींचे स्वागत केले. यावेळी मुखेड येथील मित्रसंघ यांचा 40 लोकांचा ढोलपथक आकर्षणाचा केंद्र ठरला. समाजसेवी अनिल जाजु यांच्या पुढाकाराने या पथकाचे नगरीत आगमन झाले. या पथकातील प्रमुख असलेला अवघ्या 5 वर्षीय बालक कृष्णा जाजु याने सुध्दा ढोल वाजविले. सदर कथा 1 ऑक्टोंबरपासून माहुरवेश ज्ञानगंगा परिसरात सुरु झाली असून  सोमवार 2 ऑक्टोंबर रोजी श्रीराम व श्री हनुमान जन्म, मंगळवारी 3 ऑक्टोंबर रोजी केवट, शबरी व श्री हनुमान भेट, बुधवार 4 ऑक्टोंबर रोजी श्रीराम राज्यभिषेक याप्रसंगाचे गुणगाण व कथा होणार आहे. मंगळवार 3 ऑक्टोंबरला दुपारी 12 ते सायंकाळी 7 पर्यंत रोकडीया हनुमान प्रभातफेरी मंडळ शेलू यांच्या सानिध्यात संगीतमय 108 श्रीहनुमान चालिसापाठचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरूवार 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी 1 ते 4 महाप्रसाद व सायंकाळी 7 वाजेपासून महारास सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी  मोठया संख्येने लाभ घ्यावा व कलशयात्रेत महिलांनी कलश घेवून मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.
Samrat time's 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा