रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

रावण दहन व भव्य आतिशबाजीने डोळ्याचे पारणे फेडले


 

श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचे परिश्रम


वाशीम : विजयादशमी निमित्त श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता स्थानिक माहुरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतिशबाजीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार भावनाताई गवळी, नगराध्यक्ष अशोक हेडा, डॉ. हरिष बाहेती, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, जुगलभाऊ मालपाणी, सुरेशभाऊ लोथ, गुरुमुखसिंग गुलाटी, ठाणेदार विजय पाटकर, कृउबास उपसभापती सुरेश मापारी, नगरसेवक बापुभैय्या ठाकुर, उत्तम पोटफोडे, सुभाष गट्टाणी, उमेश मोहळे, नगरसेवक राजु घोडीवाले, कृउबास सचिव बबनराव इंगळे, राजु अग्रवाल कोयाळीवाले, निलेश पेंंढारकर, कालेश्वर मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव हजारे, राजाभैय्या पवार, न.प. सभापती राहुल तुपसांडे, नगरसेवक संतोष मुरकुटे, अमित मानकर, डॉ. अरुण बिबेकर, नितीन उलेमाले, बंडु शिंदे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन देवी सरस्वती, राम, लक्ष्मण, हनुमानाच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण केेले. यावेळी मंडळाच्या वतीने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणातून खासदार भावनाताई गवळी, नगराध्यक्ष अशोक हेडा व मान्यवरांनी विजयादशमी व रावणदहनाचे महत्व विषद करताना रावणाचे प्रतिकात्मक दहन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय असल्याचे प्रतिपादन करुन सर्वाना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
    त्यानंतर भव्य आतिशबाजीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. प्रारंभी विविध आवाज करणारे पायलीबॉम्ब, कलरतोफ, आवाजतोफ, नर्सिग, चक्र, चारमिनार, दिल्ली गेट, मॅजिक झाड, धबधबा, कलर धबधबा, अनार आदी विविध प्रकारच्या फटाक्यांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर राम लक्ष्मण व हनुमानाच्या वेशभुषेत उपस्थित असलेल्या कलावंतांनी रावणदहन स्थळी जावून रामाच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातुन नागरीक व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रावणदहन कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशिल भिमजीयाणी यांनी तर आभार नामदेवराव हजारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव हजारे, उपाध्यक्ष स्वराज चौबे, लखन उपाध्ये, गणेश हजारे, महेश शर्मा, अंकित लोथ, सौरभ गट्टाणी, मनिष बत्तुलवार, गणेश बाळदी, रामचंद्र इंगळे, राजु मालपाणी, विजय संगेवार, संतोष गोटे, सचिन लोलुरे, सुरज उपाध्ये, निलेश शर्मा, विजय शर्मा, अजय संगेवार, सोनुभाऊ गुप्ता, रवि हजारे, विठ्ठल हजारे, राजु हजारे, बंडु हजारे, राजु बाळदी, कपिल शर्मा, राहुल बानकर, पवन माळेकर, गोपाल सोळंके, गणेश श्रीखंडे, महेश हजारे, अक्षय हजारे, सोनु दिक्षीत, शिवानंद वाघमारे, नितीन ठाकुर, पवन ठाकुर, गिरधारी तोष्णीवाल, नरसिंह हजारे, स्वरनेश चौबे, सुरेश बैरवार, राहुल गंडागुळे, पप्पु भडंगे आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रम शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येवून पोलीसांनी या कामी अथक परिश्रम घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

सम्राट न्यूज  टाइम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा