रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा


वाशीम : डॉ. बाबासाहेब अांबेडकर स्मारक समितीच्या वतीने शनिवार, 30 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात आयोजीत धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता धम्मध्वजारोहण व धम्मवंदना घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व विषद केले. तेजराव वानखडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व विषद करुन धर्मातरानंतर झालेली सामाजीक, शैक्षणिक प्रगतीची माहिती मनोगतातून व्यक्त करुन सर्वाना धम्मचक्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भिमराव कांबळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे तेजराव वानखडे, कार्याध्यक्ष मधुकर जुमडे, अ‍ॅड. संजय इंगोले, डॉ. रमेश वानखडे, परमेश्वर अंभोरे, अनंतराव तायडे, जग्गु राऊत, अरविंद उचित, शेषराव मेश्राम, काशीराम राऊत, वाय.के. इंगोले, प्रा. अनिल खाडे, कवियत्री हंसिनी उचित, निलेश सोमाणी, शोभाताई जोंधळे, कैलास तेलगोटे, प्रा. नारायण पाईकराव, सुधाकर पाटील, कैलास तेलगोटे, भाऊराव वानखडे, सुभाष रोकडे, सागर जोंधळे, विलास इंगोले, देवराव खडसे, ज्ञानेश्वर अढागळे, रिपाइं युवा जिल्हाध्यक्ष जय वानखेडे, प्रशांत सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, काशीराम राऊत यांच्यासह मोठया संख्येने समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Samrat time's

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा