मानोरा:-मा.राज्य निवडणूक आयोग,यांचे आदेश क्र.क्रमांक:रानीआ/ग्रापनी-२०१७/प्र/क्र.१७/का-८ दिनांक ०१/०९/२०१७ रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०१७ साठीग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.त्यानुसार मानोरा तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायतींसाठी दिनांक ०७/१०/२०१७ रोजी मतदान होणार आहे.त्याअनुषंगाने दिनांक २३/०९/२०१७ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानोरा येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना PPT द्वारे व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मॉक पोल करणे व इ व्ही एम मशीन सिलिंग तसेच निवडणुकीत वापरण्यात येणारे विहित नमुने बाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.त्या प्रशिक्षणाकरिता एकूण 21 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी गैरहजर होते.प्रथम प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्या अधिकारी यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत.प्रथम प्रशिक्षणास असणाऱ्या इतर सर्व अधिकारी व कर्मचारी हे दिनांक ०३/१०/२०१७ रोजी दुसर्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिताचे कलम १८८ व लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये फौजदारी कारवाई येईल अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी मानोरा यांनी दिली आहे.
धनंजय राठोड
मो.नं:-८३९०९३९८५२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा