मानोरा:-तालुक्यातील दापुरा बु" या गावात ग्रामपंचायत च्या वतीने सम्पूर्ण गावात धूर फवारणी करण्यात आली व या पुढे सुदधा फवारणी करण्यात येणार आहे.
सध्या अनेक ठिकाणी साथ रोगांचे थैमान आहे.तश्याच प्रकारचे साथ रोग म्हणजे डेंग्यू, मलेरिया व इतर साथ रोग या भागात डोके वर काढु नये यासाठी दापुरा ग्रामपंचायत ने स्वखर्चाणे फवारणी यंत्र विकत घेऊन सम्पूर्ण गावात धूर फवारणी करीत आहे.साथ रोगांचे थैमान गावात पसरू नये यासाठी ग्रामपंचायतने ही प्रतिबंधात्मक उपाय योजना केली आहे.त्यामुळे गावकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.गावकऱयांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
"ग्रामपंचायत दापुरा बु कडून धूर फवारणी करण्यात येत आहे.ज्यामुळे गावकऱयांचे आरोग्य निरोगी राहील.मागील ४ दिवसात २ वेळ फवारणी केली आहे आणि या पुढे सुदधा नियमित फवारणी केली जाईल.
व्ही.ए. करसडे
ग्रामसेवक,दापुरा बु".
धनंजय राठोड मानोरा
मो. नं:-८३९०९३९८५१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा