मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

बौध्द जीवनमार्ग अनुसरणाने जीवनाचे सार्थक होते - लोककवी विलास भालेराव


धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

सम्राट टाइम्स न्यूज

वाशीम : केवळ इतरांचे गुणदोष पाहील्यापेक्षा स्वत: मधील दोषावर लक्ष केंद्रीत करुन दोषमुक्त जीवन जगणे म्हणजेच बौध्द जीवनमार्ग अनुसरणाने जीवनाचे सार्थक होते, असे उद्गार पंचशील ध्वजारोहण करतांना लोककवी विलास भालेराव यांनी काढले.
    स्थानिक पंचशीलनगर येथे 30 सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक छगन काशिदे होते. भालेराव पुढे म्हणाले की, पुर्वी समाज एकमेकांच्या सहकार्यावर विसंबून होता. आज ती परिस्थिती राहीलेली नाही. आर्थीक सुबत्ता आली नसली तरी काही अंशी कुणाला कुणाशी मागण्याची फारशी आवश्यकता राहीली नाही. म्हणून सार्वजनिक उत्सव असोत की कार्यक्रम यामध्ये लोकसहभागाची वाणवा असल्याचे भासते. त्यामागचे कारणही विचारात घेणे तितकेच आवश्यक आहे. कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार कवी गायक कविनंद गायकवाड यांनी केले.
    कार्यक्रमाला चतुराबाई काशिदे, कुसुमताई सोनुने, कलावतीबाई कांबळे, राधाबाई गायकवाड, कलावतीबाई पाईकराव, शोभाबाई कांबळे, भिमराव काशिदे, सविता काशिदे, भास्कर गायकवाड, संगीता गायकवाड, अर्चना गायकवाड, सुमेध गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीतकार भास्कर गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील उपासक उपासिका बहूसंख्येने उपस्थित होत्या.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा