मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

मानोरा तालुक्यातील आमगव्हान येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या!*


 मानोरा:-तालुक्यातील मौजे आमगव्हान येथिल शेतकरी पुत्र संदीप रामधन कटारे वय ३५ वर्ष यांनी कर्जाच्या विवचनेने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. नापिकी व कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने वडिलांचे नावाने ५ एकर कोरडवाहू शेती आहे व त्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५० हजाराचे कर्ज व उसनवार असलेले कर्ज फेडाव्याचे  कशे? या विवनचनेत ते राहात होते व गळफास घेऊन त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.त्यांचे पश्चात पत्नी,वडील, एक भाऊ,दोन मुली एक आठ वर्षाची व दुसरी चार वर्षांची व एक बहीण आहे.त्यांचे आत्महत्येमुळे आमगव्हान व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

धनंजय राठोड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा