मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

आपल्या व्यवहारातील रामाचा शोध घ्या - देवी वैभवीश्रीजी श्री हनुमान रामकथेचे व्दितीय पुष्प




सम्राट टाइम्स न्यूज

वाशीम : प्रभु श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. रामाचा आदर्श प्रत्येकाने समोर ठेवून कार्य केल्यास त्याच्या जीवनाचे कल्याण होते. समाजाव्दारा दुर्लक्षित महिलांवर कृपादृष्टी ठेवणे म्हणजे राम, आईवडीलांचे महत्व आपल्या जीवनात समजून त्यांची सेवा करणे म्हणजे राम, जगातील प्रत्येक नारीची रक्षा करणे, निराधारांना आधार देणे म्हणजे राम होय. आपल्या व्यवहारात राम कुठे आहे याचा शोध घ्या असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या कृपापात्र शिष्या देवी वैभवीश्रीजी यांनी अमृतवाणीतून 2 ऑक्टोंबर रोजी श्री हनुमान रामकथेच्या व्दितीय पुष्पात केले.
    स्थानिक शुक्रवारपेठ येथील ज्ञानगंगा परिसरात बोलतांना देवी वैभवश्रीजींनी पुढे सांगीतले की, प्रत्येकाने देशाप्रती, परिवाराप्रती समर्पणाची भावना ठेवावी. ज्याने आपल्या मनाचे हवन केले तो हनुमान आहे. हनुमानाची उपासना केल्यास रिध्दी, सिध्दी, लक्ष्मी संपदा प्राप्त होते. जेव्हा आपली उर्जा कमी होते तेव्हाच दुसर्‍यांच्या प्रभावाने आपण प्रभावित होत असतो. रामाची कृपा ज्याला मिळते त्याच्या जीवनात दु:ख येणार नाही. सत्संग हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या लोकांना जनता निवडते ते विधानसभा, लोकसभेत जातात. मात्र ज्याला भगवान निवडतात ते सत्संगात येत असतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले भाव शुध्द ठेवा. जगण्याची कला आत्मसात करा. कुणाचे वाईट करु नका. नेत्रदान, अवयवदान, रक्तदान करा. असे आवाहन त्यांनी केले. कारण ज्या दानामुळे दुसर्‍यांच्या जीवनाचे कल्याण होते त्याच्या शरीरातील कमी असलेले अवयव त्याला प्राप्त होते. ते दान सर्वात महत्वपुर्ण आहे. वाईट वेळात कामा येणे ही आपली संस्कृती आहे. त्याची जोपासना करा. आर्ट ऑफ लिव्हींगने देशात अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. वाशीम येथे डॉ. हरिष बाहेती, माधवराव मारशेटवार गुरुजी यांच्या पुढाकाराने तलावाचे पुनरुज्जीवन व स्मशानभूमिचे मोक्षधाम झालेले आहे. या कार्याचा आदर्श जोपासा. असे त्यांनी सांगीतले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, जमनादास बाहेती, सनदी लेखापाल बालकिसन बाहेती, डॉ. जयकिसन बाहेती, प्रविण बाहेती,  राम बाहेती, गुड्डु बाहेती, व्दारकादास बाहेती, संदीप बाहेती यांनी परिश्रम घेतले.
    गुरूवार 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी 1 ते 4 महाप्रसाद व सायंकाळी 7 वाजेपासून महारास सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी  मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा