बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

प्रसंगातून उगवली विद्यार्थांच्या यशाची पहाट डॉ. गजपाल इंगोले यांच्या संकल्पनेतून साकारली ज्ञानगंगा,

ग्रामीण  भागातील विद्यार्थांच्या आशा पल्लवीत

सम्राट टाइम्स न्यूज

वाशीम : आजच्या जिवघेण्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भगातील विद्यार्थी टिकला पाहीजे, त्यालाही दर्जेदार शिक्षण मिळाले  पाहीजे, या उदात्त हेतूने डॉ, गजपाल इंगाले व त्यांच्या पत्नी सध्या इंगोले यांनी आपल्या गाव परीसरातील  बेरोजगार व गोर गरीब विद्यार्थां साठी प्रसंगच्या माध्यमातून शिक्षणाचे व्यासपीठ     उभारले. ज्यामूळे अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजळले असून इंगोले यांच्या कार्यांचे सर्वत्र कौतुक आहे.
वाळूस रगडता तेलही गळे या मराठीतील  ओळीनुसार कठोर परीश्रम घेतल्यास यशाला गवसणी घलता येते. ही म्हण सार्थकी ठरविली ती जयपूर ढिल्ली येथील वडील पायरोजी व आई सुभद्राबाई या शेंतमजुराच्या पोटी जन्म घेतलेल्या डॉ. गजपाल इंगोले यांनी. आपण शिकलो तरी , आपल्या गावातील आपले सहकारी, बेरोजगार युवक  शिकले पाहीजे, या विचाराने गरीबीची तमा न बाळगता २००५ मध्ये प्रसंग संस्थेची स्थापना केली. प्रसंगने अल्पावधीतच गरुडक्षेप घेत स्पर्धा परीक्षेची तयारी  करणाऱ्या शेकडो विद्याथ्र्यांच्या स्वप्नात बळ भरले. इंगोले यांनी स्पर्धा परीक्षा करिअर अ‍ॅकाडमी, व्यायाम शाळा, फायर अ‍ॅकाडमी, वृध्दाश्रम तसेच शासनाचे विविध अभ्यासक्रम अविरत चालवून  ग्रामीण विद्याथ्र्यांच्या जीवनात प्रकाश पुरविला. सोबतच विविध सामाजिक कार्यक्रम राबवून सक्षम व सुध्दृढ समाज निर्माण करण्यासाठी  डॉ. गजपाल इंगोले यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या धावपळीच्या युगात केवळ शिक्षण घेवून चालणार नाही तर सुखी आयुष्यांसाठी सृधृढ आरोग्यांची तेवढीच गरज आहे. ही बाब लक्षात घेवून गावात छत्रपती शाहू महाराज व्यायाम शाळा काढली. तसेच निराधारांचा सांभाळ करण्यासाठी वृध्दाश्रम काढून अनेकांचे जिवनमान सावरले. त्यानंतर वाशीम येथील श्रावस्ती नगर येथे २०१० मध्ये प्रसंग करीअर अ‍ॅकाडमीच्या माध्यमातून लिपीक वर्ग, पोलिस, बँक, रेल्वे, आदी साठींचे प्रशिक्षण सुरु केले. येथे  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने  स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेतले जातात. दर्जेदार शिक्षण व आवश्यक त्या सोई सुविधा तसेच तज्ज्ञांचे  मार्गदर्शन व सराव परीक्षांमूळे चार मुले पीएसआय, काही मुले पोलिस सेवेत तसेच इतर नोकNयांमध्ये गेली असून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवत जावून देशसेवा करण्याचे स्वन्प पाहत आहेत. ग्रामीण विद्याथ्र्यांना केवळ नोकरींसाठीच नव्हे तर उद्योगांमध्ये कौशल्य मिळविता यावे, यासाठी शहर परीसरात चार शेतीविषयक उद्योगांची नोंदणी केलेली आहे. प्रसंगची घौडदौड कमी होण्यएैवजी तिला अधिकच गती मिळत तिच्या शाखा आता मुंबई परिसरातील कल्याण, अंबरनाथ व भिवंडीत व आता अकोल्यात उघडून ग्रामीण विद्याथ्र्यांना सक्षम करण्यासाठी डॉ. गजपाल इंगोले अथक परीश्रम घेत आहे. सोबतच व्यावसाईक अभ्यासक्रम म्हणजेच फायर ब्रिगेड व इतर अभ्यासक्रमातूनही विद्यार्थी यशाची शिखरे पादांक्रात करीत आहेत. येथे केवळ शिक्षणच नव्हे तर समाजासाठी सृधृड माणुस घडविण्याचे कार्य केले जात आहे. या कामी  त्यांचे सासरे आर. एन. गवई यांचे  मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच  कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. संजय इंगोले, बी. आर. कांबळे, अ‍ॅड. संदीप मोरे यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.
मुलापेक्षा मुलीलाच प्राध्यान्य...
वंशाला दिवा हवा म्हणून आजही समाजात मुलांनाच प्राधान्य दिले जाते. मात्र अशा कुजलेल्या विचाराला बगल देत डॉ. गजपाल इंगोले यांनी समाजात नव आदर्श मांडला आहे. त्यांनी मुलाचा आग्रह न धरता केवळ एकाच मुलींवर  कुटुंब सिमीत केले आहे.
अंबरनाथ येथे केली रुग्णसेवा
२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरामुळे  अंबरनाथ, बदलापूर, कल्याण या परिसरात साथीच्या रोगाने थैमान घतले होते.तेव्हा  येथे संस्थेच्या वतीने १६ डॉक्टर व सामाजिक कार्यकत्र्यांना सोबत घेउन अविरत रुग्णंची सेवा केली होती. तसेच बिहार येथेही कोशनदीला आलेल्या महापूरानंतर कार्यकत्र्यांचे एक पथक महिनाभर जनतेच्या सेवेत दाखल होते.लहान असतांना आपल्या आई वडीलांनी गरीबीशी संघर्ष करुन शिक्षणासाठी घेतलेलल्या कष्टाची जाणीव डोळया समोर ठेवून हतबल न होता शिक्षणातून माणसाचा विकास साधता येवू शकतो यांचा आलेला प्रत्यय डोळयासमोर ठेवून सामाजसेवेचा वसा जपू असे विचार डॉ. गजपाल इंगोले यांनी व्यक्त केले.
जातीय सलोख्यासाठीही पुढाकार
केवळ शैक्षनिक क्षेत्रपुरातच विचार न करता सामाजिक कार्यातही डॉ. गजपाल इंगोले यांचा वाटा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा पुâले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करुन युवकांमध्ये सामाजिक एैक्य रुजविण्याचे कार्य इंगोले करीत आहेत.
विद्यार्थां नी कठोर परीश्रम घ्यावे- डॉ. इंगोले
जगात अश्यक्य असे काहीच नाही, केवळ मनात जिदद व चिकाठी ठेवून सातत्यपूर्ण केलेल्या कार्यात यश हमकाश मिळतेच. आजच्या धवपळीच्या जगात विद्यार्थांनी नियोजन करुन कठोर परीश्रम करण्याची तयारी ठेवावी.
संकटांना घबरुन न जाता ध्येय गाठावे असे आवाहन डॉ. गजपाल इंगोले यांनी केले आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा