बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

बचेरी येथील डबच्या वाड्यचा पाझर तलाव फुटला;लाखो लिटर पाणी वाया....!


---------------------------------------------------
पिलीव/सुजित सातपुते
  माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील डबच्या वाड्यावर पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने गेल्या सहा वर्षापासुन पाणी वाहून जात आहे.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. तलावात पाणी साठत नसल्याने लगतच्या विहिरींना पाणी वाढत नाही वन्य प्राणी व पशु पक्षानां पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.म्हणून या सर्व बाबींचा विचार करता फुटलेल्या सांडवाची तातडीने पुनर्रबांधणी व दुरुस्ती करावी अशी मागणी बचेरीच्या सरपंच श्रीमती कुसुमताई माने, सदस्य दादा भिढे,सदस्या राणीताई सावळजकर,सौ अस्मिता शिंदे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.सदरच्या पाझर तलावाचे सन 2004 साली बांधकाम झाले असून लाखो लिटर पाणी साठत होते.त्यामुळे लागतच्या विहीरीनां पाणी टिकून राहून हजारो क्षेत्र ओलीता खाली येत होते.तसेच शेळ्या मेंढ्या पशुपक्षी वन्य प्राण्यांना बारमाही पाणी उपलब्ध होत होते.परंतु 2011 साली झालेले अतिवृष्टी मूळे तलावाच्या वरील बाजूचा मोठा नाला फुटल्याने तलावात मार्यदेपेक्षा जास्त पावसाचे पाणी आल्याने पाझर तलावाचा सांडवा फुटला असल्याचे त्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी अशी माहिती दिली. गेल्या सहा वर्षा पासून सदरच्या तलावात पाणी साठात नसल्याने संबंधित खात्याच्या अधिकार्यांकडे,माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार हनुमंत डोळस यांच्याकडे वारंवर तक्रार करूनही दखल घेतली नाही.सदर प्रकरणाची संबंधित अधिकार्यांनी दखल न घेतल्यास बचेरी ग्रामस्थांनी माळशिरस तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा