मानोरा : कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे दवंडी पिटो या उपक्रमाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सर्वात जास्त आत्महत्या ह्या विदर्भात होत असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस हे विदर्भाचे असल्यामूळे त्यांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ . सुभाष राठोड यांनी केले.ज्या शेतकऱ्यांवर दिड लाखापेक्षा अधिक कर्ज आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी सरपंच संदिप राठोड यांच्या घरी दि. 2८ रोजी दुपारी २ वाजता उपस्थित राहावे अशी दवंडी देण्यात आली त्या प्रसंगी जमलेल्या शेतकऱ्यांनी २००६ साली कर्जमाफीचा सर्वात जास्त आत्मह्त्या विदर्भातील शेतकऱ्यांकडून झाल्या मात्र सर्वात जास्त लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला, म्हणजे रोग म्हशीला व इंजेक्शन पखालीला असा अन्याय विदर्भातील शेतकऱ्यांवर झाला. सहा एकर सात गुंठे शेत असलेल्या या गावातील शेतकऱ्यांचे केवळ ४० हजार कर्ज माफ झाले नाही मात्र तिन एकर असलेल्या पाश्चिम महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ४० लाख कर्ज माफ होते हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी करू शकतात तर काही शेतकऱ्यावरील वरील तीन लाख, काही शेतकऱ्यांवरील दोन लाख, अडीच लाख, जास्तीत जास्त पाच लाख कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी विदर्भात जन्म घेतलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करु शकत नाही का?या एका शेतकऱ्याच्या व्यथेवर डॉ. सुभाष राठोड यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. राठोड यांनी केले. घरच्या पत्नीच्या अंगावरचे दागीने मोडून नियमीत कर्ज फेड करणाऱ्या एका शेतकऱ्यांनी आम्ही कोणते पाप केले जे की आम्हाला फक्त पंचवीस टक्केच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शिवसेनेचा या नंतरचा लढा सरसकट कर्जमाफीचा असेल असेही या वेळी डॉ. राठोड यांनी सांगितले. सोयाबीनचे दुसरे पिक सुद्धा येईपर्यन्त मागील सोयाबीनचे अनुदान व तुरीचे पैसे सुध्दा आतापर्यन्त मिळाले नाही, एकीकडे आम्हाला आमचे दामाचे पैसे मिळत नाही आणि दूसरीकडे महाराष्ट्र शासन गुजरात साठी बुलेट ट्रेनला तिस हजार कोटी खर्च करते. आता आम्ही दिवाळी साजरी कशी करावी? अशा व्यथा सुद्धा उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
धनंजय राठोड मानोरा
मो.नं:-८३९०९३९८५१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा