सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम : बाल न्याय अधिनियम 2015 मधिल कलम 41 (1) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाऱ्या सर्व अनुदानित/विनाअनुदानित/शासकीय/अशासकीय/स्वयंसेवी संस्था यांनी या कायद्या अंतर्गत नोंदणी प्रमाणप्रत्र शासनाकडून प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील अशा संस्थावर या कायद्याच्या कलम 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. या कलमांतर्गत कमाल 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व रु.1 लाखापर्यंत दंड अथवा दोन्ही देण्याची तरतुद करण्यात आली आहे.
बालकांच्या काळजी व संरक्षणाकरीता कार्यरत निरिक्षणगृह/विशेषगृह, सुरक्षित जागा, (Place of sefty) बालगृह, खुले निवारागृह,विशेष दत्तक संस्था तसेच इच्छुक संस्थानी बाल न्याय (मुलांची काळजी व सरक्षण) अधिनियम 2015 मधिल कलम 41 नुसार नोंदणी प्रमाणप्रत्राचे प्रस्ताव आदर्श नियमावलीच्या परिशिष्ठ 27 मध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 6 ऑक्टोबर 2017 पुर्वी 3 प्रतीत प्रस्ताव सादर करावे, असे अवाहन सुभाष राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,वाशिम.कार्यालय खेली क्र.204 दुसरा मजला प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय काटा रोड वाशिम यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा